जालन्यात उद्या क्रांती सेनेचा मातंग समाज मेळावा राधाजी शेळके करणार मार्गदर्शन
जालना,
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीचे औचित्य साधून लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जालन्यात उद्या मातंग समाज जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांनी दिली.
मंगळवारी ( ता. 31) अंबड रोडवरील इंदेवाडी नजीक , पाण्याचा टाकीजवळ असलेल्या भोलेश्वर नगर भागात दुपारी साडेबारा वाजता होणार्या या मेळाव्यास उद्योजक घनश्याम गोयल, गणेश शिंदे, शंकरराव क्षीरसागर, सर्जेराव शिंदे, शिवनाथ काळे, मनोहर उघडे, दादाराव कांबळे, महिला प्रदेशाध्यक्षा जिजाबाई शेळके, शिवबा शेळके, बाळासाहेब साबळे, बन्सीलाल भंडारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला, तरूण व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित रहावे. असे आवाहन गणपत कांबळे, ज्ञानेश्वर शेडगे, अंकुश खोटे, बाळु काळे यांच्या सह आयोजकांनी केले आहे.