शेतकर्यांची डोकी फोडण्याचा आदेश देणार्या कर्नालच्या एश् वर उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, म्हणाले..
मुंबई,
कर्नाल एसडीएमच्या व्हायरल व्हिडिओवर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, अधिकार्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. चौटाला म्हणाले की, आयएएस अधिकार्याने शेतकर्यांसाठी अशा शब्दांचा वापर निंदनीय आहे. त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. कर्नालचे एसडीएम आयुष सिन्हा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते पोलिसांना आंदोलक शेतकर्यांचे डोके फोडण्यास सांगत आहेत.
दुष्यंत चौटाला म्हणाले की, एका स्पष्टीकरणात त्यांनी (कर्नालचे एसडीएम आयुष सिन्हा) सांगितले की ते गेल्या दोन दिवसांत झोपले नाहीत. त्यांना कदाचित माहित नसेल की शेतकरी सुद्धा वर्षात 200 दिवस झोपत नाहीत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसडीएमची प्रतिक्रियाही समोर आली आहे. आयुष सिन्हा म्हणाले की, अनेक ठिकाणी दगडफेक सुरू झाली होती. ब-ीफिंग दरम्यान, बळाचा प्रमाणात वापर करा असे सांगितले गेले.
दुसरीकडे, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कर्नालमध्ये आंदोलन करणार्या शेतकर्यांवर पोलिसांच्या कारवाईचा बचाव करताना सांगितले की, शांततापूर्ण आंदोलनाचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि एक महामार्ग रोखण्यात आला. शनिवारी भाजपच्या सभेच्या निषेधार्थ राष्ट्रीय महामार्गावर कर्नालच्या दिशेने जाणार्या शेतकर्यांच्या गटावर पोलिसांनी कथितरीत्या लाठीमार केल्याने सुमारे 10 लोक जखमी झाले.
बैठकीनंतर शनिवारी संध्याकाळी कर्नालमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, आंदोलन करणार्या शेतकर्यांनी यापूर्वी सरकारला आश्वासन दिले होते की त्यांचे आंदोलन शांततेत होईल. खट्टर म्हणाले, ठजर त्यांना निषेध करायचा होता, तर त्यांनी तो शांततेने करायला हवा होता, कोणालाही त्यावर आक्षेप नाही. यापूर्वी त्यांनी शांततापूर्ण आंदोलनाचे आश्वासन दिले होते. पण जर त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, महामार्ग रोखले तर पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पावले उचलतील. कर्नालमध्ये भाजपच्या बैठकीचा संदर्भ देत ते म्हणाले की ही पक्षाची राज्यस्तरीय बैठक होती आणि ‘शेतकरी संघटनांनी त्याला विरोध करण्यासाठी केलेल्या आवाहनाचा मी निषेध करतो‘.