राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत जमावबंदीचे उल्लंघन, या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी,

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत जमावबंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे. या प्रककरणी आणि कोविड-19च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह 30 ते 40 व्यक्तींवर गुन्हे दाखल तर भाजपचे नेते माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह 50 ते 60 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा 135, 188, 143 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कणकवलीत राणेंची जनआशीर्वाद यात्रा

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पोहोचली आहे. आमदार आशिष शेलार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हेही यात्रेत सहभागी झाले आहेत. राणे यांनी यावेळी एसटी कर्मचार्‍यांवरुन महाविकास आघाडीवर टीका केली. तर आशिष शेलार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. त्यावेळी कणकवलीत राणेंचं जंगी स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन त्यांनी आपली यात्रा सुरु केली. आशिष शेलार आणि विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरही नारायण राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेत सहभागी झालेत. यावेळी राणेंनी एसटी कामगारांच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!