पॅरालिम्पिक : भाविना उपात्य सामन्यात, टेबल टेनिसमध्ये पदक पक्के केले

टोकियो

भारताची भाविना पटेलने येथे सुरु असलेल्या टोकियो पॅरालम्पिक खेळात महिला टेबल टेनिस एकल क्लास 4 च्या उपात्य सामन्यात पोहचण्या बरोबरच देशासाठी पदक सुनिश्चित केले आहे.

गुजरातमधील अहमदाबादची 34 वर्षीय भाविनाने 2016 च्या रियो पॅरालम्पिकची सुवर्ण पदक विजेत्या सर्बियाच्या बोरिसलावा पॅरिच संकोविचला 3-0 अशा सरळ सेटने पराभूत करुन उपात्य सामन्यात प्रवेश केला.

भाविनाने 19 मिनिट चालेल्या सामन्यात संकोविचला 11-5, 11-6, 11-7 ने पराभूत केले. भाविना पहिली भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे जिने पॅरालम्पिक खेळाच्या उपात्य सामन्यात प्रवेश केला आहे. उपात्य सामन्यात भाविनाचा सामना शनिवारी चीनच्या झांग मिआशी होईल.

भारताने आता पर्यंत पॅरालम्पिकमध्ये तीन क्रीडा प्रकारात 12 पदके जिंकली असून यामध्ये अ‍ॅथलेटिक्स (तीन सूवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य), पॉवरलिफ्टिंगमध्ये एक कांस्य आणि जलतरणमध्ये एक सुवर्ण सामिल आहे.

भाविनाला गट-एमधील सामन्यात चीनच्या झोउ यिंगकडून पराभावाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर तिने चांगल्या पध्दतीने वापसी केली आणि दोन नॉकआऊट सामन्यामध्ये जिंकून पदक निश्चित केले.

भाविनाने या आधी राउंड-16 मध्ये 23 मिनिट चालेल्या सामन्यात ब-ाझीलच्या जिओसी डी ओलिविएरिआला 12-10, 13-11, 11-6 ने पराभूत करुन उपात्यपूर्व सामन्यात प्रवेश केला होता. भाविनाने 2017 मध्ये बिजिंगमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ आशियायी पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!