इंग्लंडच्या पहिल्या डावात 433 धावा, आता टीम इंडियासमोर 354 धावांची मजबूत आघाडी
नवी दिल्ली
इंग्लडने भारताविरूद्धच्या तिसर्या कसोटीच्या तिसर्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस पहिल्या डावात 432 धावा करत 354 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात फक्त 78 धावा केल्या आहेत. कर्णधार जो रूट 165 बॉलमध्ये 121 धावा केल्या आहे. त्यामुळे इंग्लंडने भारतासमोर 432 उभारल्या आहे.
इंग्लंडने आज 8 बाद 423 धावांपुढे खेळण्यास सुरूवात केली. क्रेग ओव्हर्टनने 24 धावा केल्या. शमीने ओव्हर्टनला आणि बुमराहने रॉबिन्सनला बाद करत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. इंग्लंडकडून रुट शिवाय अलवावा डेविड मलानने 70, हसीब हमीदने 68, रोरी बर्न्सने 61, जॉनी बेयरस्टोने 29, क्रेग ओवरटनने 32, सॅम कर्रनने 15, मोइन अली ने आठ, जोस बटलरने सात धावा केल्या. ओली रॉबिंसन आणि जेम्स एंडरसन एकही धाव न करता तंबूत परतले.
भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक चार विकेट घेतले. तर मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतेले. ईशांत शर्माने एकही विकेट घेतले नाही. . इंग्लंडकडे आता 354 धावांची मजबूत आघाडी असून भारताला दुसर्या डावात चांगला खेळ करणे अपेक्षित आहे. पावसामुळे खेळात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. आज तिसर्या दिवसाचा खेळ खेळण्यात येणार असून ज्यामध्ये भारताल जवळपास 84 षटकांची फलंदाजी करावी लागेल, त्यानंतर अजून दोन दिवस खेळ सुरू राहिल.
भारताचा पहिला डाव
तिसर्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 78 धावांवर ऑॅल आऊट झाली. इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे 9 खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. भारतीय संघाने आपले शेवटचे 5 फलंदाज फक्त 11 धावांवर गमावले. रोहित शर्मा (19) आणि अजिंक्य रहाणे (18) सोडले, तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताच्या डावात केएल राहुल 00, चेतेश्वर पुजारा 01, विराट कोहली 07, ॠषभ पंत 02, रवींद्र जडेजा 04, मोहम्मद शमी 00, जसप्रीत बुमराह 00 आणि मोहम्मद सिराज यांनी 03 धावा केल्या, तर इशांत शर्मा 08 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने अतिरिक्त 16 धावा दिल्या अन्यथा भारतीय संघ 62 धावांवर सर्वबाद झाला असता.