दिल्ली पोलिसांनी तीन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या दोन मुलांना त्यांच्या कुटुंबाला भेटविले
नवी दिल्ली,
दिल्ली पोलिसांनी तीन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या दोन मुलांना शोधले असून त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सोपविले आहे. ज्यावेळी हे मुल बेपत्ता झाली होती त्यावेळी त्यांचे वय अनुक्रमे 12 वर्ष आणि 14 वर्ष होते.
शोध अभियानाच्या दरम्यान पोलिसांनी बेपत्ता मुलांसाठी घरो घरी जाऊन पडतापळणी केली आणि त्यांच्या जवळच्या मित्रांचीही चौकशी केली.
बेपत्ता मुलांना शोधण्याचे काम करणार्या पोलिसांच्या टिमने या मुलां बाबतची अधिकत्तम उपलब्ध माहितीला जिप नेटवर साझा केले आणि मोबाईल क्रमांकचा शोध घेण्यासाठी गुगल मॅपिंगचा उपयोग केला. खूप प्रयत्न केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या टिमने गुप्त सूत्रांच्या मदतीने दोनीही मुलांना हरियाणातील फरीदाबादमध्ये शोधून काढले. टिम घटनास्थळावर पोहचली आणि यांना यशस्वीपणे शोधून काढले.
दक्षिण-पूर्व दिल्लीच्या पोलिस उपायुक्त आर.पी.मिणांनी म्हटले की शेवटी तीन वर्षाच्या कठोर प्रयत्नानंतर फरीदाबादमध्ये दोनीही मुलाचा पत्ता लावला गेला आहे. दोनीही मुलांना पुढील आवश्यक कारवाईसाठी संबंधीत तपास अधिकार्यांकडे सुरक्षीतपणे सोपविले गेले आहे. पोलिस टिमने या दोनीही मुलांना फक्त कुटुंबालाच मिळवून दिले नाही तर दिल्ली पोलिसांच्या ऑपरेशन मिलापच्या उद्देशालाही पूर्ण केले आहे.
28 फेबुवारी 2018 ला दिल्ली पोलिस (बाराखंभा रोड पोलिस स्टेशन) ला दोन बेपत्ता मुलांच्या संबंधात तक्रार मिळाली होती. नंतर यामध्ये 363 आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला गेला होता आणि मुलांना सुरक्षीतपणे शोधण्यासाठी 40 हजार रुपये इनामाची घोषणाही केली गेली होती.