काँग्रेस पक्ष सभांसाठी पैसे देऊन लोकांना आणतो आहे – मायावती

लखनऊ,

देशात काँग-ेसची स्थिती सध्या खूप खराब असून काँग-ेस सभांसाठी पैसे देऊन लोकांना आणत आहे आणि हीच काँग-ेसची गर्दी जमविण्याची संस्कृति आहे असा हल्लाबोल बहुजन समाज पक्ष (बसप) च्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावतीनी काँग-ेसवर केला.

मायावतीनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना काँग-ेसवर जोरदार हल्ला करत म्हटले की काँग-ेसच्या पोटात यासाठी दुखत आहे कारण ते निवडणुक सभांमध्ये गर्दीला जमविण्यासाठी पैसे देऊन लोकांना आणत आहेत. तर हे मजूर खूप आनंदी होतात कारण विना कामाचे काँग-ेसच्या सभेत गेल्याने जास्त पैसे मिळतील आणि जेवनही मिळेल. यामुळे काँग-ेसची स्थिती समजत आहे. देशा बरोबरच राज्यांमध्येही काँग-ेसची स्थिती खूप वाईट आहे.

त्यांनी म्हटले की उत्तर प्रदेशमध्ये निवडणुक लढण्यासाठी काँग-ेसला उमेदवारही मिळत नाहीत. बसपा मात्र काँग-ेस सारखे पैसे देऊन निवडणुक लढवत नाही तर जे स्वत: लढू शकतात आणि जनाधार वाढवू शकतात अशाच उमेदवारांना तिकीट देत आहे. काँग-ेसने प्रथम आपले घर ठिक केले पाहिजे.

मायावतीनी म्हटले की बसपा तिकीटाच्या बदल्यात कोणाकडूनही पैसे घेत नाही परंतु सदस्यतेच्या नावावर काही लोकांकडून मजबूरीने अगाऊ पैसे जमा करावे लागते आहे आणि यातून दुसर्‍या आर्थिकपणे कमजोर उमेदवाराला मदत केली जाते आहे. कार्यकर्ते देणगी जमा करुन आर्थिकपणे कमजोर उमेदवारांना मदत करतात.

त्यांनी म्हटले की आमचा पक्ष श्रीमंत शेठांचा पक्ष नाही तर गरीब व मजूरांचा पक्ष आहे. काँग-ेस तसेच अन्य काही लोक याचा चूकीचा प्रचार करत आहेत परंतु याचा विशेष कोणताही लाभ त्यांना मिळणार नाही.

मायावतीनी म्हटले की याआधी आमचे कार्यकर्ते माझा वाढदिवस जनकल्याणकारी दिवसाच्या रुपात साजरा करत होते आणि त्यांना महागडे दागिणे आणि कपडे देण्यास मनाई केल्यानंतरही ते देत होते. यावर त्यांना याला मानाई केली आणि म्हटले की जर त्यांना असे वाटत असेल तर त्यांनी याच्या ऐवजी सदस्यताचे पुस्तक न्यावे. आता प्रत्येक वेळी त्यांचा वाढदिवस अशाच प्रमाणे साजरा केला जातो. कार्यकर्ते सदस्यता पुस्तक घेऊन जातात आणि सदस्य बनवतात. अशा प्रकारे आर्थिक मदतीमध्ये आमच्याकडे कोणतीही मनाई नाही.

त्यांनी म्हटले की देशात बीएसपी हा एकमेव पक्ष आहे जो काँग-ेस व अन्य पक्षां सारखे आपल्या संघटनेला चालविण्यासाठी आणि निवडणुका लढविण्यासाठी मोठ मोठया भांडवली आणि श्रीमंत शेठांकडून आर्थिक मदत घेत नाही. ऐवढेच नाही तर काँग-ेस तर पैसे घेण्याच्या ऐवजमध्ये त्यांना राज्यसभेत पाठवत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!