प्रलंबीत मुद्दांना सोडविण्यासाठी भारत व पाकिस्तानने चर्चा करावी – मुजाहिद
नवी दिल्ली,
भारत व पाकिस्ताने आपले सर्व प्रलंबीत मुद्दांना सोडविण्यासाठी एकत्रपणे चर्चा केली पाहिजे कारण दोनीही शेजारी देश असून त्यांचे हित एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. काश्मीर प्रश्नांवर आपल्या पहिल्या टिपणीमध्ये तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने हे मत व्यक्त केले.
तालिबानी प्रवक्ता मुजाहिदने ही टिपणी पाकिस्तानी टिव्ही वाहिणी एआरवाय न्यूजला दिलेल्या मुलाखती दरम्यान केली. एआरवाय न्यूजनुसार जम्मू व काश्मीरच्या मुद्दांवर मुजाहिदने म्हटले की नवी दिल्लीने वादग-स्त भागाच्या प्रति सकारात्मक दृष्टिकोण ठेवण्याची जरुरी आहे.
मुजाहिदने देशां बरोबरील विशेष करुन भारता बरोबरील संबंधा बाबत म्हटले की तालिबान भारतासह सर्व देशां बरोबर चांगले संबंध ठेवू इच्छित आहे. जो या भागातील एक महत्वपूर्ण भाग आहे. आमची इच्छा आहे की भारताने आपल्या धोरणाला अफगाण लोकांच्या हिताच्या अनुरुप बनवावे. त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हटले की तालिबान कोणत्याही अन्य देशाच्या विरोधात अफगाण जमिनीचा वापर होऊ देणार नाही.
एआरवाय न्यूजने सांगितले की तालिबानच्या प्रवकत्याने आपले विचार मांडताना म्हटले की पाकिस्तान व भारताने आपल्या सर्व प्रलंबीत मुद्दांना सोडविण्यासाठी एकत्रपणे चर्चा केली पाहिजे. कारण दोनीही शेजारी आहेत आणि अनेक हित एकमेकांशी संबंधीत आहेत.
मुजाहिदने बुधवारी म्हटले की समूहा जो आता अफगाणिस्तानवर शासन करत आहे पाकिस्तानला आपले दुसरे घर मानत आहे आणि तो अफगाणिस्तानच्या जमिनीला अशा कोणत्याही हालचालींसाठी परवानगी देणार नाही जे पाकिस्तानच्या हिताच्या विरुध्द असेल.