अफगाणिस्तानमधून अमेरिकेने माघार घेतल्याने स्थिती नियंत्रणात नाही – मॅक्रो
डबलिन,
अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेण्याची कालमर्यादा 31 ऑगस्टपासून पुढे न वाढविण्याचा निर्णय घेतल्याने आम्हां सर्वांना अशा स्थितीत टाकले आहे जी आता नियंत्रणात नाही असे मत फ्राँसचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रोनी व्यक्त केले.
फ्राँसचे राष्ट्रपती मॅक्रोनी गुरुवारी आयरलँडचे पंतप्रधान माइकल मार्टिन बरोबर डबलिनच्या एकदिवशीय दौर्याच्या दरम्यान एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ही टिपणी केली.
अमेरिका आणि त्यांच्या सहयोगीनी वॉशिंग्टनच्या निर्णयानंतर आपल्या नैतिक जबाबदारीला धोका दिला आहे का ? असे विचारले असता राष्ट्रपती मॅक्रोनी म्हटले की मी विश्वासघात शब्दाचा वापर करणार नाही. अमेरिकेच्या निर्णयाच्या कारणामुळे अन्य देशांसाठी नागरीकांना बाहेर काढणे सुरु ठेवणे सुरक्षीत असणार नाही.
मॅक्रोने म्हटले की आम्ही अधिकतम ऑपरेशन करण्यासाठी शेवटच्या मिनिटा पर्यंत कठोर मेहनत आणि चांगल्या प्रकारे काम केले पाहिजे आणि आपल्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे.
मॅक्रोनी म्हटले की फ्राँसने आता पर्यत 2600 लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत केली आणि यापैकी जवळपास दोन हजार अफगाणि नागरीकही सामिल आहेत आणि लोकांना बाहेर काढण्याचे काम अजूनही सुरु आहे. आम्ही यशस्वी होऊत याची मी कोणतीही हमी देऊ शकत नाही कारण सुरक्षा स्थिती नियंत्रणात नाही.
फ्राँसचे राष्ट्रपती मॅक्रो एकदिवसाच्या दौर्यासाठी आयरलँडची राजधानी डाबलिनला पोहचले. त्यांच्या बरोबरील बैठकीच्या आधी आयरीश राष्ट्रपती माइकल हिगिंसनी त्यांचे स्वागत केले. या दरम्यान दोनीही बाजूने अफगाणिस्तानच्या मुद्या व्यतिरीक्त चिंताच्या अन्य मुद्दांवर चर्चा झाली.