खनिज संसाधनाच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत आणि अर्जेंटिना प्रजासत्ताक यांच्यातील सामंजस्य करारासाठी मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली–
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खाण मंत्रालय, भारत सरकार आणि अर्जेंटिना प्रजासत्ताकच्या उत्पादक विकास मंत्रालयाचे खाण धोरण सचिवालय यांच्यात सामंजस्य करारासाठी मान्यता देण्यात आली.
खनिज संसाधन क्षेत्रात सहकार्यासाठी हा सामंजस्य करार संस्थात्मक यंत्रणा पुरवेल.
उत्खनन, खाणकाम आणि लिथियमचे लाभ मिळविणे यासह खनिजशोध आणि विकासाला चालना आणि विकास यासाठी सहकार्य आणि गतिविधी वृद्धिंगत करणे, ही या सामंजस्य कराराची उद्दीष्टे आहेत. परस्पर फायद्यासाठी महत्त्वाची आणि सामरिक खनिजे, मूळ धातू क्षेत्रात संयुक्त उद्यम निर्मितीची शक्यता पडताळणी, तांत्रिक आणि वैज्ञानिक माहितीचे आदानप्रदान, कल्पना व ज्ञानाचे आदानप्रदान, प्रशिक्षण आणि क्षमताबांधणी; आणि खाणकाम क्षेत्रात गुंतवणूक व विकासाला चालना ही नाविन्यपूर्ण उद्दीष्टे ठरणार आहेत.