संरक्षण मंत्र्यांनी केले पुण्यातील नीरज चोप्रा स्टेडियमचे उद्घाटन

पुणे,

टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राचे नाव पुण्यातील आर्मी स्पोटर्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला देण्यात आले आहे. या समारंभाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. या स्टेडियमला ‘नीरज चोप्रा स्टेडियम आर्मी स्पोटर्स इन्स्टिट्यूट’ असे नाव देण्यात आले आहे. यावेळी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे हे सुद्धा उपस्थित होते.

नीरजने पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण दलांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. देशातील प्रत्येकाला नीरजच्या कामगिरीचा अभिमान असून तो एका खर्‍या सैनिकासारखा लढल्याचे संरक्षण दलांनी म्हटले होते. नीरजला 15 मे 2016 पासून 4 राजपूताना रायफल्सच्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

ऑॅलिम्पिक स्पर्धेत भारताने अ?ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकत 121 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. भारताला अ?ॅथलेटिक्स प्रकारात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळाले आहे. नीरजने अंतिम फेरीत 87.58 मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. तर दुसरीकडे भारताला 13 वर्षांनंतर ऑॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!