धुळ्यात एसटी चालकाची आत्महत्या, अनियमित पगारामुळे आत्महत्या केल्याचा दावा
धुळे,
साक्री आगारातील कमलेश बेडसे या चालकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनियमित पगारा पोटी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. या एसटी चालकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केलीये.
कोरोना काळानंतर अनियमित होणारे पगार आणि ओढवलेला आर्थिक संकट यामुळे बेडसे यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. या कर्मचार्याच्या आत्महत्येमुळे साक्री आगारातील कर्मचार्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
आगारात आणि महामार्गावर बसेस आहेत त्या तिथेच सोडून देण्यात आल्या आहेत. मयत बेडसे यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. आर्थिक मदत झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंब आणि कर्मचारी संघटनेने म्हटलं आहे. आंदोलनामुळे नागपूर-सुरत महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.