ऐनपूर महाविद्यालयात उद्योजकता हीच करिअर निवड या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
ऐनपूर प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे )
ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे कबचौउमवि सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजेस (केसीआयआयएल) जळगाव अंतर्गत कबचौउमवि नाविन्य आणि उद्योजकता विकास कक्षाची (केआयईडीसी) स्थापना करण्यात आली. सदर कक्षाच्या माध्यमातून उद्योजकता हीच करिअरची निवड यावर प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची दोन दिवशीय विकसन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरुवातीला कबचौउमवि नाविन्य आणि उद्योजकता विकास कक्षाचे उद्घाटन केसीआयआयएलचे डायरेक्टर डॉ. विकास व्ही. गिते यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने व प्रमुख मार्गदर्शक म्हणून केसीआयआयएलचे इनक्युबेशन व्यवस्थापक निखील कुलकर्णी हे उपस्थित होते. गिते सरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक निखील कुलकर्णी यांनी अनेक उदाहरण देऊन केसीआयआयएलचे महत्व पटवून दिले. अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी मार्गदर्शन केले. प्रथम दिवसाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एन. वैष्णव यांनी तर आभार प्रा. एस. आर. इंगळे यांनी मानले. तसेच विद्यार्थ्यांकरिता दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम ऑनलाईन झूम अँपच्या माध्यमातून घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून केसीआयआयएलचे समन्वयक व डायरेक्टर प्रा. भूषण चौधरी तसेच केसीआयआयएलचे सीईओ श्री. मानवीन सिंग चढ्ढा हे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. डी. बी. पाटील यांनी तर आभार डॉ. पी. आर. महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यायातील केआयईडीसी कक्षाचे प्रमुख डॉ. डी. बी. पाटील, केआयईडीसी कक्षाचे समन्वयक डॉ. जे.पी. नेहेते, डॉ. एस. एन. वैष्णव, प्रा. एस. आर. इंगळे, डॉ. पी. आर. महाजन, डॉ. एस. ए. पाटील, डॉ. एस. एस. साळुंके तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
——————————————————————————————————————————————————————————————————————————————-
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण ऐनपूर परिसरातीलबातमी 9922358586 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रमोद कोंडे
ऐनपूर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9922358586