नगरसेवकाची मित्राच्या पत्नीवर वाईट नजर, महिलेने नवर्यासह नगरसेवकाला चपलेने फटकवलं
बालौदबाजार,
छत्तीसगडमधील बलौदाबाजार जिल्ह्यातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हीडिओत एक महिला भाजपच्या नगरसेवकाला चपलेने चोपताना दिसतेय. या दरम्यान मारहाण करणार्या महिलेचा पतीही तिथे उपस्थित आहे. तो आपल्या पत्नीला मारहाण करण्यापासून रोखताना दिसतोय. मात्र ती महिला त्या नगरसेवकाची तुफान धुलाई करतेय. या दरम्यान ती महिला आपल्या नवर्यालाही चोप देताना दिसतेय.
नक्की काय झालं?
तुम्ही म्हणाल की नवर्यासह मित्राला मारहाण करण्यामागचं कारण काय. या महिलेच्या नवर्याच्या मित्राने जे काही केलंय, ते ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. या लिंगपिसाट भाजपच्या नगरसेवकाने मित्राच्या बायकोला सेक्सची ऑॅफर दिली. सूर्यकांत ताम-कर असं या भाजप नगरसवेकाचं नाव आहे. दोघेही जिवलग मित्र होते. 2 आठवड्यांपूर्वी हा नगरसेवक मित्राच्या घरी गेला. या दरम्यान या लिंगपिसाट नगरसेवकाने मित्राच्या बायकोला सेक्सची ऑॅफर दिली. वहिणी-दिराच्या नात्यात हे सर्व चालतं असं म्हणत त्याने ऑॅफर दिली. यानंतर महिलेचा पारा चढला. त्यानंतर महिलेने या विकृत नगरसेवकासह पतीलाही चांगला चोप दिला.