मालोद येथे पीक प्रात्यक्षिक प्रकल्प संपन्न

रावेर तालुका प्रतिनिधी ( प्रदीप महाराज mob-7887987888 )

कृषी विज्ञान केंद्र,पाल मार्फत यावल तालुक्यातील मालोद येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021-22 अंतर्गत २५ एकर क्षेत्रावर खरीप हंगामातील मुंग पिकावरील समूह पंक्ती प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करून उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठा पुरविण्यात आल्या.त्यानिमित्त शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.या लाभार्थी शेतकऱ्यांना बियाणे,बीजप्रक्रिया साठी जिवाणू खते, कीडनियंत्रणासाठी कीडनाशके तसेच पिवळे चिकट सापळे निविष्ठा म्हणून वाटप करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री रमेश चौधरी तसेच नितिन पाटिल,धीरज चौधरी यांनी आपल्या शेतामध्ये भरघोस उत्पादन मिळाले असे मनोगत व्यक्त केले के व्ही के चे प्रभारी प्रमुख श्री.महेश महाजन यांनी कमी खर्चातील तंत्रज्ञान अवगत करून अधिक उत्पादन घेण्याचा सल्ला तांत्रिक मार्गदर्शन करतांना दिला.तसेच श्री.अतुल पाटील शास्त्रद्म यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारावे असे मत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाप्रसंगी लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

——————————————————————————————————————————————————————————————————————————————–

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू

प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!