उल्लू धोकाधडी प्रकरणातील आरोपी हिना जाबिर बेगची जमानत याचिका फेटाळली

लखनऊ,

उल्लू डिजिटल प्राइव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि कार्यकारी निदेशकांना ब्लॅकमेल करणारी महिला हिना जाबिर बेगची जमानत याचिका सीजेएम न्यायालयाने फेटाळली आहे.

हिना जाबिर बेग 14 दिवसांच्या न्यायिक रिमांडवर लखनऊमधील जिल्हा कारागृहामध्ये बंद असून तिला मागिल आठवडयात लखनऊला आणले गेले आणि न्यायालया समोर हजर केल्यानंतर जेलमध्ये पाठविले गेले.

मिळालेल्या माहितीनुसार हिना आपल्या सहयोगींच्या मदतीने जालसाजी आणि धोकाधडीचे नेटवर्क चालवत होती. ऐवढेच नाही तर उल्लू डिजिटल प्राइव्हेट लिमिटेडमध्ये कायदा प्रमुख होती. तिने कंपनीकडून 15 लाख रुपये घेतले होते आणि तिच्या विरोधात तक्रार नोंदविल्या गेल्यानंतर तिला लखनऊ साइबर सेलने मुंबईतून अटक केली. हिनाचे अन्य साथीदार अजूनही फरार आहेत.

पोलिस सूत्रांनी सांगितले की हिनाचा पार्टनर आमिर अली असून जो अमेरिकेत राहत आहे आणि टेक्सासमधून तिच्या खात्यात पैसे स्थानांतरीत करत असे. नंतर हे पैसे रुडकी निवासी ऐमान रहमानच्या खात्यात वापस पाठविले गेले आणि परत या पैश्यांना गटातील सदस्यांमध्ये वाटप करण्यात आले. यातील एकाची ओळख मुंबईचा रहिवाशी अजहर जमादारच्या रुपात झाली आहे.

सूत्रांनी सांगितले की अजहर पोलिस अधिकारी बनून लोकांना धमकवत होता. साइबर सेल आता या पूर्ण गँगची पार्श्वभूमी तपास करत असून हे अजून इतर कोणत्याही गुन्ह्यात तर सामिल नाही ना.

साइबर सेलच्या एका वरिष्ठ अधिकर्‍याने सांगितले की हिनाने कथीतपणे कंपनीचे सीईओ आणि कार्यकारी निदेशकाना ई-मेल पाठवून त्यांना मुकदम्यात अडकविण्याची धमकी दिली होती आणि आरोप करण्यात आला होता की ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रसिध्द वेब सीरीजमध्ये आक्षेपाहार्य सामग-ी आहे.

उल्लू डिजिटल प्राइव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी निदेशक शोभित सिंहनी 10 जून 2021 ला राजधानीतील साइबर क्राइम ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. तपासाच्या दरम्यान माहिती पडले की ज्या आयडीवरुन ई-मेंल पाठविला गेला होता याचा वापर हिना जाबिर बेग करत होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!