आंध- पोलिसांनी 620 किलो गांजा जप्त केला, एकाला अटक
कृष्णावरम (आंध- प्रदेश),
आंध- प्रदेश पोलिसांनी राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात 600 किलोग-ॅमपेक्षा अधिक गांजा जप्त केला आहे. याची किंमत 12 लाख रुपये आहे. मादक पदार्थला एका ट्रकमधून महाराष्ट्रात नेले जात होते अशी माहिती एका अधिकार्याने बुधवारी दिली. वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.
पूर्व गोदावरीचे पोलिस अधिक्षक एम.रवींद्रनाथ बाबूद्वारा प्राप्त माहितीवर कारवाई करत पोलिसांनी एनएच- 16 वरील कृष्णावरम टोल प्लाझावर एक चौकी स्थापित केली आणि वाहनांचा तपास सुरु केला.21 पोत्यांमध्ये भरलले 620 किलोग-ॅमचा गांजा हा माराष्ट्राचा क्रमांक असलेल्या एक ट्रक मधून जप्त करण्यात आला. पोलिस अधिकार्याने सांगितले की, गांजाला लपविण्यासाठी ट्रकच्या मागील भागाला झाकण्यासाठी एक तिरपाल शिटचा वापर करण्यात आला होता आणि असे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला होता की ट्रक रिकामा आहे.
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असलेला ट्रक चालक अब्दुल कलीम उर्फ नजीर शेख (51) ला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सामिल अजून दोन आरोपी एक महाराष्ट्रातील व दुसरा आंध- प्रदेशातील दाराकोंडाचा फरार आहेत. शेखने विशाखा एजेंसी भागातील दाराकोंडा गावातून गांजा मागविला आणि याला महाराष्ट्रात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता.