जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केला सत्कार
जळगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांच्या प्रशासनाचा कार्यकाळ चाळीसगाव येथील गटविकास अधिकारी म्हणून सुरू झाला होता. आज त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंदभाऊ पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर आप्पा सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी गणेश चौधरी यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत आपल्या प्रशासकीय अनुभवातून समाजाला मार्गदर्शन करीत रहावे. अशी आशा व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.