’भारताची रत्ने’- ऑॅनलाईन चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून भारतरत्नांना सलाम
मुंबई,
भारताचा मानबिंदू असलेल्या काही मान्यवरांच्या कार्यकतृर्त्वाला सलामी देणारा विशेष ऑॅनलाईन तीन दिवसीय चित्रपट महोत्सव -भारताची रत्ने’आजपासून सुरु झाला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत, देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आलेल्या विज्ञान, कला आणि संस्कृती क्षेत्रातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचे चरित्रपट दाखवून त्यांचे स्मरण केले जाईल. यात प्रा.सी.व्ही. रमण, डॉ. एम. विश्वेश्वरय्या, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रा. सी. एन. आर. राव, सत्यजित रे, एम. एस. सुब्बुलक्ष्मी, पं. रवीशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि पं.भीमसेन जोशी यांच्यावरील चरित्रपट दाखवले जात आहेत.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून फिल्म्स डिव्हिजनने ’राष्ट्राला सलाम’ हा एक आठवड्याचा कार्यक्रम 23 ते 29 ऑॅगस्ट, 2021 दरम्यान आयोजित केला आहे. याअंतर्गत, ’ए व्हॉयेज ऑॅफ प्रोग-ेस’ आणि ’रत्नज ऑॅफ इंडिया’ या ऑॅनलाईन चित्रपट महोत्सवांचे आणि ’कालौघात चित्रपट निर्मितीमध्ये तांत्रिक प्रगती’ या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
’राष्ट्राला सलाम’ च्या दुसर्या भागात, सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आलेले विज्ञान, कला आणि संस्कृती क्षेत्रातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचे चरित्रपट दाखवून त्यांचे स्मरण केले जाणार आहे.
29 ऑॅगस्ट, 2021 रोजी ’कालौघात चित्रपट निर्मितीमध्ये तांत्रिक प्रगती’ या वेबिनारने आठवडाभर चालणार्या कार्यक्रमाचा समारोप होईल. वेबिनारमध्ये चर्चेनंतर चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि तंत्रज्ञ देशभरातील माध्यम क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.