शेतकर्याने जिल्हाधिकार्यांकडे मागितली गांजा लागवडीची परवानगी
सोलापूर,
मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील एका शेतकर्याने गांजाची शेती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (26 ऑॅगस्ट) निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच सकून गायकवाड यांनीदेखील यापूर्वी टोमॅटोला मिळालेल्या भावाला कंटाळून गांजाचे पीक पिकवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.
शेतकर्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल हे काही सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी आपल्या शेतात राबून टोमॅटो पिकाची लागवड केली. परंतु, त्याच पिकाने शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी टोमॅटोच्या पिकाने अडचणीत आला आहे. बाजारात टोमॅटोची विक्री कवडीमोल दराने होत असल्याने मार्केटमधून घराकडे येत असताना अनेक शेतकर्यांनी टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर जिल्ह्यात टोमॅटोची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे. या टोमॅटोच्या पिकाला चांगला भाव येईल अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. परंतु, शेतकर्यांच्या या आशेवर पाणी फिरले आहे. बाजारात या टोमॅटोची विक्री 3 ते 4 रुपये किलो दराने होत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी टोमॅटो बाजारात न विकताच घराकडे परत आणत असताना रस्त्याच्या कडेला हजारो टन टोमॅटो फेकून दिली आहेत.
शेती पिकाला हमी भाव नसल्याने शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. सोलापूरच्या एका शेतकर्याने गांजा पिकाची लागवड करण्याची परवानगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागितली आहे. शेतकर्याच्या शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कोणते पीक घ्यावे त्याला हमी भाव मिळेल हे सांगता येत नसल्याने हमीभाव असलेला गांजा पिकवण्याची परवानगी सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्याने मागितली आहे. माझ्या मालकीच्या शेतात दोन एकर गांजा लावण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकार्यांना या शेतकर्याने दिल्याने याची एकच चर्चा सोलापूर जिल्ह्यातील गावागावात सुरू आहे. अनिल आबाजी पाटील यांची सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर येथे स्वत:च्या मालकीची जमीन गट नं 1814 असून, या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी असे निवेदन जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला त्यांनी लेखी दिले आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने अनेक शेतकर्यांनी आपल्या शेतातील टरबूज, कलिंगड कवडीमोल दराने विकल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर शेतकर्यांनी अनेक उभी पिके शेतात गाडून टाकली होती. लॉकडाऊनने शेतकरी अडचणीत आले असताना टोमॅटोच्या पिकाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग-स्त झाला आहे.
सुकून गायकवाड या शेतकर्याने माहिती देताना सांगितले की, मोहोळ-बार्शी रोडला माझी शेती असून एक एकर टोमॅटोची लागवड केली आहे. यासाठी मला सव्वा लाख रुपये खर्च आला आहे. बाजारात टोमॅटोची 3 ते 4 रुपये दराने विक्री होत असल्याने ती शेतातच खराब होत आहे. आमच्याकडे टोमॅटो तोडणार्या मजुरांना देण्यासाठी पैसे देखील नाहीत, असे ते सांगतात.
रात्रंदिवस शेतात कष्ट करूनही शेतकर्यांना फळ मिळत नाही. शेतकर्यांना वालीच उरला नाही. व्यापार्यांच्या टोमॅटोच्या एका कॅरेटला 10 रुपये भाडे आहे. आम्ही शेतात केलेले कष्ट वायपट मातीत चालले आहे. लाख-सव्वा लाख रुपये मातीत गेले आहेत. नुसता भाव आला-आला म्हणतात पण ऊस, केळी, द्राक्ष याही पिकांची तीच परिस्थिती आहे. शेतकर्यांनी पीक घ्यावे कोणते असा प्रश्न निर्माण झाला आहे. गांजाची शेती करावे म्हटले तर पोलीस लगेच पकडायला येतात, अशी खंत मोहोळ येथील एका शेतकर्याने व्यक्त केली.