महिला क्रिकेट : मेघना आणि यास्तिका ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय संघात सामिल
नवी दिल्ली,
रेल्वेकडून खेळणारी मध्यम गतीची वेगवान गोलंदाज मेघना सिंह आणि बडोदाची डावख्ुरी फलंदाज यास्तिका भाटियाला सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुध्द खेळण्यात येणार्या एकमेव कसोटी, एकदिवशीय आणि टि-20 मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात सामिल करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दौर्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड जी गुडघ्याला झालेल्या जखमेच्या कारणामुळे दौर्यातून बाहेर गेली होती. तिला सर्व प्रारुपमधील सामन्यांसाठी संघात सामिल करण्यात आले आहे.
नुकत्याच इंग्लंडचा दौरा करणारी राधा यादव, प्रिया पुनिया, अरुंधती रेड्डी आणि इंद्राणी रॉय यांना मात्र ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी संघात सामिल करण्यात आलेले नाही. मात्र हिमाचल प्रदेशची 25 वर्षीय गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरला टि-20 संघात सामिल करण्यात आले आहे.
या दौर्यात मिताली राज कसोटी आणि एकदिवशीय मालिकेत संघाची कर्णधारी करेल तर हरमनप्रीत कौर टि-20 मालिकेत संघाची कर्णधारी करेल. स्मृति मंधाना ही संघाची उपकर्णधार असेल.
दौर्यात संघ एकदिवशीय मालिकेतील सामने 19, 22 आणि 24 सप्टेंबरला खेळेल तर दोनी संघातील एकमेव कसोटी सामना हा 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर दरम्यान खेळला जाईल. टि-20 सामन्याची मालिका 7, 9 व 11 ऑक्टोंबरला खेळली जाईल.
एकमेव कसोटी आणि एक दिवशीय मालिकेसाठी भारतीय महिला संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृति मंधाना, शैफाली वर्मा, पूनम राउत, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ति शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे, झूलन गोस्वामी, मेघना सिंह, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, ॠचा घोष, एकता बिष्ट.
भारतीय महिला टि-20 संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शैफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स,दीप्ति शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया,पूनम यादव, ॠचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका सिंह ठाकूर.