नेहरु युवा केंद्राकडून 28 ऑॅगस्ट रोजी ‘फीट इंडिया फ्रीडम रन’ चे आयोजन

पणजी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयातर्फे नेहरु युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देशभर ‘फीट इंडिया फ्रीडम रन’ चे आयोजन करण्यात येत आहे.

नागरिकांमध्ये शारिरीक तंदुरीस्तीबाबत जागृती करण्यासाठी ‘फिटनेस का डोज आधा घंटा रोज’ हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या ‘फीट इंडिया फ्रीडम रन’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, साई संघटनेच्या वतीने 28 तारखेला सकाळी 7.30 वाजता पणजी येथे आझाद मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत ‘फीट इंडिया फ्रीडम रन’ चा आरंभ करण्यात येणार आहे.

या रनममध्ये जास्तीत युवकर्‍युवतींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!