अमिताभ बच्चन यांच्या गाडीत पोलिसांनी पकडलं ’सलमान खान’ला, कागदपत्राशिवाय चालवत होता ठेश्रश्री ठेूलश
बेंगळुरू प्रतिनिधी
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक बिग बी अमिताभ बच्चन आणि दबंग अभिनेता सलमान खान यांची नावं वाचून तुमच्या भुवया उंचावल्या असतील. अर्थातच, तसं होणं स्वाभाविकच आहे. ही बातमीच तशी आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक देशी-विदेशी महागड्या कार आहेत. तसंच सलमानकडेही आहेत. पण ही कल्पना कशी वाटते की बच्चन यांची कार सलमान चालवत होता. कदाचित तुम्हाला वाटलं असेल टेस्ट ड्राइव्ह घेतली असेल सलमानने. पण तसं काहीही झालेलं नाही.
त्याचं झालं असं की कर्नाटकातल्या बेंगळुरूमध्ये वाहतूक पोलीस गाड्यांची तपासणी करत होते. प्रत्येक कार थांबवून त्याची कागदपत्रं तपासली जात होती. तेवढ्यात एक आलिशान महागडी रोल्स रॉयस कार तिथे आली. नियमाप्रमाणे पोलिसांनी त्या कारचालकाला थांबवलं आणि त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. त्याच्याकडे कागदपत्रं नव्हती. पोलिसांनी त्याला नाव विचारलं तर तो म्हणाला, ’सलमान खान’. गाडी कुणाची आहे विचारल्यावर तो म्हणाला, ’अमिताभ बच्चन यांची’. पोलिसांनी लगेच गाडीचं रजिस्ट्रेशन तपासलं तर खरोखरच ती कार महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावे रजिस्टर्ड होती. नवभारतने याबाबत वृत्त दिले आहे.
परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त नरेंद्र होळकर म्हणाले, ’जप्त केलेली कार चालवणार्या व्यक्तीचं नाव सलमान खान होतं पण तो अभिनेता सलमान खान नाही. त्याने पुढे सांगितलं की त्याने 2019 मध्ये महानायक अमिताभ यांच्याकडून 6 कोटी रुपयांना ही कार विकत घेतली. त्याच्याकडे दोन रोल्स रॉयस कार आहेत. त्याची मुलं कधीकधी अमिताभ यांची कार घेऊन जातात. जेव्हा कार जप्त केली तेव्हा त्याची मुलगी पण कारमध्ये होती. या कारचालकाकडे कागदपत्रं नव्हती म्हणून आम्ही ती रोल्स रॉयस कार जप्त करण्यात आली.’ होळकर यांनी सांगितलं की त्या व्यक्तीने अमिताभ बच्चन यांनी सही केलेली गाडीची कागदपत्रंही दाखवली आहेत. त्यामुळे खरोखरच ही कार बच्चन यांच्या नावे रजिस्टर्ड आहे.
असा हा किस्सा घडला आणि पोलीसही बुचकळ्यात पडले. कार आहे बच्चन यांची आणि ती चालवतो आहे सलमान खान. त्यामुळे पोलिसांनीही पुन्हा खुलासा केला की कारचे मालक महानायक अभिनेते अमिताभ बच्चन आहेत हे जरी खरं असलं तरीही ती चालवणारी व्यक्ती अभिनेता सलमान खान नाही.