लोक माझ्या बाबत बोलतात याने आनंदी आहे – रहाणे
नवी दिल्ली,
जे लोक मी फॉर्ममध्ये नसल्याच्या कारणामुळे टिका करत आहेत मी त्यांना महत्वपूर्ण जाणीव करुन देत आहे. तसेच मी कमी धावा करण्या बाबत चिंतीत नाही असे मत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सोमवारी व्यक्त केले.
रहाणेने सोमवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटले की लोक माझ्या बाबत बोलत आहेत हे पाहून मी आनंदी आहे. माझे सततचे म्हणणे आहे की लोक महत्वपूर्ण लोकां बाबत सतत बोलतात. यामुळे मी या बाबत जास्त चिंतीत नाही आणि हे फक्त संघामध्ये योगदान देण्याची गोष्ट आहे.
त्याने म्हटले की सर्व गोष्टी मला प्रेरित करत आहेत. देशासाठी खेळणे मला प्रेरित करत आहे मी टिकेमुळे परेशान होत नाही. लोक फक्त जरुरी लोकांवरच टिका करतात आणि ते माझ्यावर टिका करत आहेत. मी फक्त नियंत्रणावर लक्ष केंद्रित करत आहे.
रहाणेने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुध्द दुसर्या कसोटी सामन्यात शतक केले होते. यानंतर त्याने 16 डावांमध्ये फक्त दोन अर्ध शतके केली आहेत.
रहाणेने म्हटले की लॉर्डसमध्ये खेळलेला डाव माझ्यासाठी संतोषजनक होता. मी योगदान देण्यावर विश्वास करतो आहे. मी फक्त संघा बाबत विचार करतो आणि मला वाटते की 61 किंवा 62 धावांचे योगदान देणेही महत्वपूर्ण आहे. हे संतोषजनक आहे.
रहाणेच्या व्यतिरीक्त चेतेश्वर पुजाराही धावा काढण्यात यशस्वी राहिला नाही. रहाणेची चार डावामध्ये सरासरी 65 ची होती तर पुजाराची वर्तमान मालिकेत सरासरी 70 ची आहे.
रहाणेने म्हटले की पुजारा आणि मी दिर्घकाळा पासून खेळत आहोत आणि आम्हांला माहिती आहे की दबावातून आणि स्थितून कसे जाणे आहे. आम्ही यासाठी चिंतीत नाही आणि आम्ही फक्त संघावर लक्ष केंद्रित करत आहोत. जे आमच्या नियंत्रणात नाही त्या बाबत आम्ही विचार करत नाहीत.