कुत्ते मोशन पोस्टर : कॅपर थि-लरमध्ये तब्बू, अर्जून कूपूर, नासिरुद्दीन शाह यांच्यासह दिग्गज झळकणार

मुंबई,

चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज यांनी सोमवारी अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, तब्बू आणि राधिका मदन यांच्यासह त्यांच्या मल्टी स्टारर कुत्ते या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपट निर्माते लव रंजन यांच्या सहकार्याने तयार होणार्‍या या चित्रपटात विशाल भारद्वाज यांचा मुलगा आस्मान भारद्वाज या चित्रपटाचे पहिल्यांदाच दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात नेटफ्लिक्सवरील गाजलेल्या ’इब आले ऊ’ या चित्रपटातील लोकप्रिय कलाकार कुमुद मिश्रा आणि शार्दुल भारद्वाज यांच्याही भूमिका आहेत. विशाल भारद्वाज यांच्या अधिकृत इन्स्टाग-ामवर हे मोशन पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे.

आस्मान आणि विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून कुत्ते हा एक कॅपर-थि-लर चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. हा चित्रपट सध्या त्याच्या प्री-प्रोडक्शन स्टेजमध्ये आहे आणि 2021 च्या अखेरीस शूटिंग सुरू होईल. आसमानने स्कूल ऑॅफ व्हिज्युअल आटर्स, न्यूयॉर्कमध्ये फिल्म मेकिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि सात खून माफ, मातृ की बिजली का मंडोला आणि पटाखा या चित्रपटांसाठी वडीलांना दिग्दर्शनात मदत केली आहे.

मुलासोबत पहिलाच सिनेमा असल्यामुळे विशाल भारद्वाज यांनी कुत्ते हा एक खास चित्रपट असल्याचे म्हटले आहे. ‘तो हा चित्रपट कसा बनवतोय हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक झालो आहे. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स देखील प्रथमच एकत्र येत आहेत आणि मी या असोसिएशनबद्दल खूप उत्सुक आहे. कारण लव यांच्याकडे चित्रपट निर्मिती आणि मजबूत व्यावसायिक भान आहे, याची मी प्रशंसा करतो.,‘ असे विशाल भारद्वाज म्हणाले.

ठमी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत नसीर साहब, तब्बू, कोंकणा आणि राधिका यांच्यासोबत वेगवेगळ्या चित्रपटांसाठी काम केले आहे आणि आस्मानने त्या सर्वांना एकाच चित्रपटात एकत्र आणले आहे. आम्ही प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर या मोहक थि-लरची भुरळ घालण्यासाठी फार काळ वाट पाहू शकत नाही. ‘, असेही ते म्हणाले.

राजन म्हणाले की, भारद्वाज यांची कथा सांगण्याची दृष्टी त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. ‘मला आस्मानच्या चित्रपटासाठी त्याच्यासोबत काम करताना खूप आनंद मिळतो आहे.‘

या चित्रपटासाठी गुलजार यांनी लिहिलेल्या गीतांना विशाल भारद्वाज संगीतबध्द करणार आहेत. विशाल भारद्वाजची पत्नी, गायिका रेखा भारद्वाज आणि अंकुर गर्ग यांनाही या चित्रपटाचे निर्माते म्हणून श्रेय दिले जात आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!