न्यूजऑॅनएअर रेडिओ थेट-प्रसारणाची जागतिक क्रमवारी
नवी दिल्ली,
न्यूजऑॅनएअर क्रमवारीच्या मोजणीत नवी उत्साहवर्धक भर घालत एआयआरन्यूज 24ङ7 च्या जागतिक प्रसारणाने देखील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमाचा दर्जा मिळविला आहे. सकाळच्या बातम्या,समाचार प्रभात, सत्य के प्रयोग आणि आज सवेरे हे जागतिक पातळीवर एआयआरन्यूज 24ङ7 चे काही अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहेत.
भारताखेरीज ज्या इतर प्रमुख देशांमध्ये आकाशवाणीच्या न्यूज ऑॅन एअर अॅपचे थेट प्रसारण सर्वाधिक लोकप्रिय आहे अशा देशांच्या अलीकडच्या क्रमवारीत न्यूझीलंडने अव्वल 10 देशांमधील सौदी अरेबियाचे 10 वे स्थान पटकावले असून सौदी अरेबियाला अव्वल 10 देशांच्या यादीतून हटवत यादीत पुन्हा स्थान मिळविले आहे.
भारताशिवाय जागतिक पातळीवर होणार्या थेट एआयआर प्रसारणाच्या क्रमवारीत मोठे बदल घडवत, आकाशवाणी थि-सुर आणि आकाशवाणी अनंतपुरी ने पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट 10 मध्ये स्थान मिळविले आहे, तर आकाशवाणी कोडाईकॅनाल आणि अस्मिता मुंबई यांनी या 10 मधील स्थान गमावले आहे. एआयआर चेन्नई रेनबो वाहिनीची 5 व्या स्थानावरून 8 व्या स्थानी घसरण झाली असून एआयआर कोची एफएम रेनबोने क्रमवारीची शिडी चढत 5 वे स्थान पटकावले आहे.
सर्वोत्कृष्ट आकाशवाणी प्रसारणासाठी भारताशिवाय इतर देशांच्या क्रमवारीत, न्यूझीलंडमध्ये विविध भारती राष्ट्रीय, एफएम गोल्ड दिल्ली, एफएम रेनबो दिल्ली, एआयआर कोची आणि विविध भारती बेंगळूरू या वाहिन्या लोकप्रिय आहेत. मध्यपूर्वेकडील देशांमध्ये लोकप्रियता मिळविण्यासोबतच, आकाशवाणी थि-सुरचे सिंगापूर, हाँगकाँग आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात श्रोते आहेत. आकाशवाणीचे श्रोते असलेल्या सर्व प्रमुख 10 देशांमध्ये विविध भारती राष्ट्रीय वाहिनीने सर्वात लोकप्रिय वाहिनीचा मान कायम राखला आहे.
प्रसार भारतीचे अधिकृत ?प असलेल्या न्यूज ऑॅन एअर ?पवर आकाशवाणीच्या 240 हून अधिक रेडियो सेवांचे थेट प्रसारण होते. आकाशवाणीच्या न्यूज ऑॅन एअर ?पवरील या सेवांचे श्रोते केवळ भारतातच आहेत असे नव्हे तर जगातील 85 हून अधिक देशांमध्ये आणि 8000 हून जास्त शहरांमध्ये मोठ्या संख्येने श्रोते हे कार्यक्रम ऐकतात.
भारताशिवाय ज्या इतर देशांमध्ये आकाशवाणीच्या न्यूज ऑन एअर अॅपवरील थेट सेवा सर्वाधिक लोकप्रिय आहेत ते देश तसेच या देशांची आकाशवाणीच्या न्यूज ऑन एअर अॅपवरील सर्वोकृष्ट थेट प्रसारणाची विस्तृत माहिती येथे देत आहोत. यात लोकप्रिय कार्यक्रमांची देशनिहाय वर्गवारी देखील उपलब्ध आहे. ही क्रमवारी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 या पंधरवड्यातील आकडेवारीवर आधारित आहे.