निशब्द! 5 बहिणींनी भावाच्या मृतदेहाला बांधली राखी; अशी राखीपौर्णिमा कोणलाही पाहावी लागू नये

नलगोंडा,

तेलंगणामधील नलगोंडामधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे 5 बहिणींनी राखीपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मृत भावाला राखी बांधली. ही घटना सोशल मीडियावर आता चर्चेचा विषय ठरली आहे.

तेलंगणा टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, गेल्या शनिवारी सायंकाळी चिंतापल्ली लक्ष्मैया याच्या पाच बहिणी राखीपौर्णिमेच्या निमित्ताने भावाच्या घरी आल्या होत्या. रविवारी राखीपौर्णिमेच्या सकाळी चिंतापल्ली याची प्रकृती अचानक खालावली आणि तो जमिनीवर कोसळला. यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. चिंतापल्ली याचं वय 59 वर्षे होते. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला जबर धक्काच बसला. घरातील सर्व सदस्य जोरजोरात रडू लागले. सर्वांनी मिळून राखीपौर्णिमेचा सण साजरा करणार होते, मात्र राखीपौर्णिमेच्या दिवशीच त्यांच्या भावाची घरातून अर्थी निघणार होती. यावेळी कुटुंबावर काय आघात झाला असेल याचा आपण विचारही करू शकत नाही.

घरात चिंतापल्लीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. कोणत्याच राखीपौर्णिमेला भावाचा हात कधीच रिकामा राहिला नाही. यंदाही भावासाठी आम्ही इथे आलो आहे. यंदाच्या राखीपौर्णिमेलाही त्याचा हात रिकामा राहणार नाही. असं म्हणत त्याच्या पाचही बहिणी लक्ष्म्मा, नामा, पद्मा, अलीपुरे वेंकटम्मा, कादिरी कोटम्मा आणि जक्की कविता या बहिणींनी मृत भावाच्या हातावर राखी बांधली.

चिंतापल्लीला राखी बांधल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ चिंतापल्लीला शेवटचा निरोप देताना त्याच्या पाचही बहिणीने अश्रू थांबत नव्हते. त्यांचा आपल्या भावावर जीव होता. चिंतापल्लीची बहीण पद्माने सांगितलं की, लग्नानंतर असा एकही दिवस नव्हता जेव्हा त्यांनी राखीपौर्णिमेचा सण साजरा केला नाही. ही मात्र त्यांची शेवटची राखीपौर्णिमा ठरली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!