मध्य प्रदेशमध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्या बरोबर मुलींना वीस हजार रुपये मिळतील
भोपाळ,
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रक्षाबंधन (राखी पौर्णिमा) निमित्त राज्यातील मुलीना एक मोठी भेट दिली असून त्यांनी घोषणा केली की लाडली लक्ष्मी योजने अंतर्गत महाविद्यालयात प्रवेश घेणार्या मुलींना एक रक्कमी वीस हजार रुपये दिले जातील.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी चर्चा करताना म्हटले की मुली सुखी, स्वस्थ आणि प्रसन्न रहावे ही देवाकडे प्रार्थना करतो आहे. भारतामध्ये अनादिकाळापासून आई, बहिण आणि मुलीना अत्यंत सन्मानाचे स्थान दिले गेले आहे. जेथे महिलांची पूजा होते तेथे देवही निवास करतात. आम्ही निश्चित केले आहे की महाविद्यालयामध्ये मुलींनी प्रवेश घेतल्या बरोबर लाडली लक्ष्मी योजने अंतर्गत एक रक्कमी 20 हजार रुपयांची रक्कम प्रदान केली जाईल.
त्यांनी पुढे सांगितले की मी मुलीना आश्वस्त करतो की त्यांच्या उच्च शिक्षणाचीही पूर्ण व्यवस्था केली जाईल. यासाठी आवश्यक आर्थिक व्यवस्थाही केल्या जातील. महिला स्वसहाय्यता समुहांना सरकारची हमी आणि कमी व्याजावर कर्ज देण्याची व्यवस्था केली जात आहे.
राज्य सरकारद्वारा महिलांसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा हवाला देत मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले की बहिणींच्या नावाने संपत्तीचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) करणे असेल तर शुल्क फक्त एक टक्का असेल अशी व्यवस्था आम्ही केली आहे. मला आनंद आहे की रजिस्ट्री शुल्क एक टक्का केल्याच्या कारणामुळे बहिणींच्या बाजूने 10 टक्के रजिस्ट्री जास्त झाल्या आहेत.
बालिकां बरोबर होणार्या धोक्यांच्या घटनांवर मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले की नाव बदलून धोका देणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही धर्मिक स्वतंत्रता कायदा लागू केला. हरवलेल्या मुलीना सुरक्षीतपणे घरी आणण्यासाठी मुस्कान अभियान चालविले आहे.
अर्धी लोकसंख्या (फक्त महिला) च्या सशक्तीकरणा बाबत आपले मत जाहिर करत मुख्यमंत्री चौहान म्हणाले की माझ्या मते खर्या अर्थाने जर देशाचे सशक्तीकरण करणे आहे तर बहिणींचे सशक्तीकरण आवश्यक आहे.