शेतकर्‍यांनी वनशेती सह संशोधित बियाणांची कास धरावी;प्रदेशाध्यक्ष दिनेश ठाकरे

जालना,

दिवसेंदिवस तोट्यात चाललेला शेतीव्यवसाय फायदेशीर होण्याकरिता शेतकर्‍यांनी पारंपरिक शेती सोबतच वन शेती सह ,संशोधित केलेल्या दर्जेदार बियाणांची कास धरावी. असे आवाहन मराठा सेवा संघ प्रणित कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी केले.

पिरकल्याण ता. जालना येथे कृषी परिषदे तर्फे रविवारी ( ता. 22) आयोजित शेतकरी मेळाव्यात दिनेश ठाकरे बोलत होते. राष्ट्रपती पदक विजेते लहुराव देशमुख, दशरथ महात्मे, पुनम गुसिंगे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण पवार, पंकज ढाकणे, कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद पाटील, यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

दिनेश ठाकरे पुढे म्हणाले, शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मर्जीनुसार बियाणे वापरण्याचे स्वातंर्त्य मिळायला हवे, तसेच दर्जेदार संशोधन केलेले बियाणे पुरविणे गरजेचे असून वनशेती चे महत्त्व ही त्यांनी विषद केले.

तुळशीराम चंद पाटील यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबाव्यात, शेतीतून लाखो रुपये उत्पन्न मिळून शेतकरी समृद्ध करण्यासाठी कृषी परिषदे तर्फे जिल्ह्यात सुरू असलेल्या कार्याविषयी तुळशीराम चंद पाटील यांनी माहिती दिली. सुञसंचालन जिल्हा प्रवक्ते सदाशिव भुतेकर यांनी केले तर भुषण चंद यांनी आभार मानले.

या वेळी जिल्हा संघटक नंदकुमार जाधव,जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर सतकर, सरपंच विलासराव देशमुख, अशोक शिरसाठ, पंडित चव्हाण, दिनकर भुतेकर, विजय साबळे, प्रकाश वायसे, बाळू इंदलकर ,फकीरा शेळके, अशोक राऊत, बुधनार ,हनुमंतराव आनंदे ,बापूराव घुमरे, संग्राम पाटील ,कृष्णा टेकाळे, गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर कापसे, संजय म्हस्के,गजानन चंद, पुंजाराम टेकाळे, बिचकुले, वानखेडे, काठोरे पाटील यांच्या सह शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!