पालघरमध्ये महावितरणच्या उपअभियंत्याची ग्राहकाला दमबाजी, गुन्हा दाखल करण्याचीही धमकी
पालघर,
वाडा येथील तोरणे गावातील वीज गेल्याने तक्रार मांडणार्या नागरिकाला वाड्यातील महावितरणचे उपअभियंता कृष्णानंद दळवी यांनी चक्क दमबाजी केली आहे. फोनवर तक्रार करणार्या त्या नागरिकाला अर्वाच्च भाषेत दम भरल्याने आणि या संदर्भातील संभाषण व्हायरल झाल्याने तीव- संताप व्यक्त होत आहे.
तोराणे गावातील वीज शुक्रवारी रात्री गेली होती. वीजवाहक तार तुटल्याने वीज गेली याची माहिती महावितरणच्या कर्मचार्यांना दिली होती. मात्र तरीही वीज येत नाहीत म्हणून गावातील काही तरूण ट्रान्सफार्मर पाहणी करायला गेले असता तेथील कटाऊट तिथेच काढून ठेवले होते. त्यामुळे दुर्घटना होण्याची भीती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर येथील नागरिक सदानंद मोकाशी यांनी उपअभियंता दळवी यांना फोन करून तक्रार मांडली.
त्यावर संतापलेल्या दळवी यांनी अर्वाच्च भाषेत बोलत त्यांची लाज काढली. जास्त बोललात तर तुमच्यावर केस दाखल करीन म्हणत गावात आलो तर तुम्हाला महागात पडेल असा दम भरला. मोकाशी यांनी उपअभियंता दळवी यांना फोन केल्यावर त्यांनी अक्षरश: धमकीच दिल्यानं आता महावितरणच्या अधिकार्यांकडे तक्रार मांडणे हा गुन्हा झालाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या गंभीर प्रकारानंतर मुजोर अधिकारी दळवी यांच्या कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलीय.
गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने आपण उपअभियंता कृष्णानंद दळवी यांना फोन केला. त्यांच्याशी सौजन्याने बोलत असतानाही ते अर्वाच्च भाषेत बोलून दम देत होते. आम्ही वीजग-ाहक म्हणून तक्रारही करायची नाही का? असं सदानंद मोकाशी यांनी म्हटलं आहे.
महावितरणचे उपअभियंता दळवी यांनी एका सामान्य नागरिकांशी केलेले वार्तन गंभीर असून अशा मुजोर अधिकार्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी नागरिक करत आहेत. उपअभियंता कृष्णानंद दळवी यांच्याविरोधात तक्रार आली असून कोणाही नागरिकाशी अशाप्रकारे बोलणं गैर आहे. या घटनेसंदर्भात चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठवू, उप कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांनी म्हटलं आहे.