देशातील 483 पायाभूत योजनांची गुंतवणुक 4.43 लाख कोटी रुपयाने वाढली

नवी दिल्ली,

देशातील 483 पायाभूत योजनांतील गुंतवणुकीची किंमत 1 ऑगस्ट 2021 ला 4.43 लाख कोटी रुपयाने वाढली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाद्वारा जुलैसाठी प्रसिध्द केंद्रिय क्षेत्रातील योजनांसाठी फ्लॅश रिपोर्टमधून माहिती पडले की 504 योजना निर्धारीत काळाच्या मागे आहेत.

अहवालामध्ये सांगण्यात आले की 1,781 योजनांच्या कार्यान्वयाची मूळ गुंतवणुक 22,82,160.40 कोटी रुपये होती आणि ंयाची अंदाजीत पूर्णता गुंतवणुक 27,25,408.00 कोटी रुपये होण्याची शक्यता आहे जी 4,43,247.60 कोटी रुपयांची एकूण गुंतवणुक वाढ (मूळ गुंतवणुकीचा 19.42 टक्के) दर्शवत आहे.

या योजनांवर जुलै 2021 पर्यंत 13,22,515.87 कोटी रुपयांचा खर्च केला गेला आहे जे योजनेच्या अंदाजीत गुंतवणुकीचे 48.53 टक्के आहे.

अहवालामध्ये सांगण्यात आले की 1,781 योजनांपैकी 13 योजना निर्धारीत कालावधीच्या पुढे आहेत. 263 योजना वेळेवर आहेत, 504 निर्धारीत कालावधीच्या मागे आहेत तर 483 योजनांमध्ये गुंतवणुकीतील वाढीची माहिती दिली आहे आणि 199 योजनांनी आपल्या मूळ योजना कार्यान्वयन कार्यक्रमाच्या संबंधात वेळ आणि गुंतवणुक दोनीहीमधील वाढीची माहिती दिली आहे.

पुढे सांगण्यात आले की जर विलंबीतची मोजणी पूर्णताच्या नवीनतम अनुसूचीच्या आधारावर केली गेली तर विलंबीत योजनांची संख्या कमी होऊन 369 झाली आहे. या व्यतिरीक्त 1,001 योजनांचे चालू होण्याचे वर्ष किंवा संभावित निर्माण कालावधीची कोणतीही माहिती दिली गेली नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!