सातपुड्याच्या पायथ्याशी अजून एक खून… खून करून प्रेत गाडून ताकत आरोपींनी केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न .. रावेर तालुक्यातील पाडले शिवारातील घटना … पत्नी सह सात आरोपी गजाआड ….
रावेर प्रतिनिधी:-
पत्नीला सुमारे तीन वर्षा पूर्वि पळवून नेल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या पतीने लाठ्या-काठ्या व गळा दाबून तसेच विहिरीत टाकून खून केल्याची घटना आज उघडकीस आली . याबाबत रावेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पाडळा खूर्द (ता. रावेर ) येथील प्रताप खुमसिंग भिल (वय ४६) याने लक्ष्मण वेरसिंग भिल याच्या पत्नीस सुमारे तीन वर्षा पूर्वि पळवून नेले होते. या संतापात लक्ष्मण भिल, सागरीबाई भिल रा . रोहीणी ता . नेपानगर, झिंगला शाहादा भिल ,बसाली बोरी बुजुर्ग ता . बऱ्हाणपूर, ईस्माईल हसन तडवी,महेबुब कासम तडवी दोघे रा. पाडला ता .रावेर , यांनी प्रताप यास टोकर व काठ्यनी डोक्यावर मारहाण केली. झिंगला भिल याने गळा दाबून त्यास जीवे ठार मारून त्याचे प्रेत विहीरीत टाकले .दोन तीन दिवसां नंतर प्रेत फुगुन पाण्यावर तरंगत असल्यामुळे टाल्या शाहादा भिल, जितेंद्र सुरमल भिल व सुरमल छत्तरसिंग भिल यांनी प्रताप यांचे प्रेत विहीरीतून बाहेर काढून पुरावा नष्ट करण्यासाठी पाडळा खूर्द येथील शिवारातील नागोरी नदीचे बाजूला मिराबाई गोविंदा चौधरी यांचे शेतात सदर शव खड्डा खोदून गाडू न टाकले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत भारत खूमसिंग भिल राहणार बसाली यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान सदरची घटना सुमारे पंधरा दिवसापूर्वी घडल्याने सदर शवचा पंचनामा जागेवरच करण्यात आला यावेळी तहसीलदार उषा राणी देव गुणे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एन डी महाजन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नाईक पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांनी केला दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल जावरे जगदीश पाटील मनोज मस्के प्रमोद पाटील महेंद्र सुरवाडे सुरेश मेढे प्रदीप सपकाळे सचिन घुगे यांनी मध्य प्रदेशात जाऊन संशयितांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोहर जाधव करीत आहेत.
सदर मयात हा आदिवासी कुटुंबातील असून येत्या महिन्यात ही दुसरी घटना आहे सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मात्र रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे. व त्यांची सर्व सहकारी यांनी प्रत्येक घटनेचा अवघ्या काही दिवसात छडा लावण्यात यशस्वी झाले असल्याने कर्तव्य दक्षतेने काम करीत असल्याचे बोलले जात आहे