नगरपालिकेच्या सभा आता ऑफलाइन घेण्यास परवानगी द्या : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांची मागणी

सावदा प्रतिनिधी- ( प्रदीप कुलकर्णी )

जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिकेत दि.१७ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेली ऑनलाइन सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीपासून नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने हो मोबाईल नेटवर्क कधी ऑन कधी ऑफ होत असल्याने सदरील सभेत कोणता विषय सुरू आहे? किंवा कोणत्या विषयावर आपले मत व्यवस्थित मांडावे कोणता विषय मंजूर करावे की विरोध नोंदवावा याबाबत नगरसेवकांना त्यावेळी मोठी समस्या निर्माण होऊन त्रास सहन करावा लागला.

म्हणूनच सध्या कोरूना आटोक्यात आल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद च्या सभा ऑफलाइन करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी येथील नगरपरिषदेची माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र देऊन केली आहे.

तसेच दीड ते दोन वर्षात कोरोना विषाणूमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र ठाकरे सरकारने महामारी आटोक्यात आणण्यासाठी वेळोवेळी राज्यात काळजीपूर्वक व समाधानकारक कामे केल्याने कोरोना महामारी आटोक्यात आली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात दिवसाला केवळ चार ते पाच रुग्ण आढळून येत आहे. तसेच संचारबंदी चे अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहे. यामुळे जीवन पूर्वपदावर आले आहे. तरी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपरिषदेच्या पुढील सभा ऑनलाइन ऐवजी ऑफलाईन घेण्याची परवानगी देण्यात यावी. कारण की नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज येत नाही किंवा कनेक्ट होत नाही म्हणून चालू सभेच्या वेळी नगरसेवकांना समस्या येत आहे. याकडे लक्ष देऊन सभा ऑफलाइन घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे.

येथील नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी नगरपरिषदेच्या सभा ऑनलाइन एवजी आता ऑफलाइन घेण्यास परवानगी मिळावी अशी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे कडे केलेली मागणी रास्त व वस्तुस्थितीला अनुसरून आहेत व यासंदर्भात लवकरच मी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना याबाबत लवकरच निवेदन देणार असल्याची माहिती येथील नगरसेविका नंदाताई मिलिंद लोखंडे यांनी दिले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!