मा.श्रीराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर येथे वाढदिवस अभिष्टचिंतन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा
प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे mob.- 9922358586 )
रावेर तालुक्यातील एक व्यक्तीमत्व ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं,सामान्य माणसापर्यंत पोहचून, अडल्यानडल्यांची सातत्याने सेवा करणारे शेतकऱ्यांचे कैवारी, कोरोना संसर्ग महामारी काळात कोरोना योद्धा म्हणून महत्वाची भूमिका बजाविणारे सर्वांना मदत करणारे दादासाहेब श्रीराम पाटील यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त रावेर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. रंजना प्रल्हाद पाटील असतील तर रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, माजी मंत्री आ.गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीष दादा चौधरी, यासह जिल्ह्यातील आमदार माजी आमदार खासदार माजी खासदार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा मध्यवर्ती बँकेचे संचालक जिल्हा परिषद सभापती व सदस्य जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नगरसेवक सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उद्योजक तसेच कृषी क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांची वाढदिवसाला विशेषता उपस्थिती राहणार आहे.
अभिष्टचिंतन सोहळा व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा….
दिनांक 26 /8 /2021. गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता. श्रीराम मॉयक्रो व्हिजन ऍकेडमी, सावदा रोड, रावेर, (विवरा जवळ ) मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे. तरी सर्व क्षेत्रातील नागरिक बंधू भगिनींनी युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दादासाहेब श्रीराम पाटील मित्र परिवार रावेर यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.