धरणगाव महाविद्यालयात प्रा.मंगेश पाटील यांच्या वाढदिवसाप्रसंगी वृक्षारोपण.
धरणगाव प्रतिनिधी हर्षल चौहान-९४२०२९९२४९.
धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी मंगेश प्रल्हाद पाटील यांचा आज दि. २१ ऑगस्ट २०२१ रोजी वाढदिवस निमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात कार्यालयीन अधीक्षक श्री. डी. जी. चव्हाण (नाना) यांच्या हस्ते निम, पिंपळ आणि वड या वृक्षाचे रोपण करण्यात आले. मंगेश पाटील हे धरणगाव महाविद्यालयाचे ह.भ.प. प्रा. स्व. पी. बी. पाटील सर, अनोरेकर यांचे चिरंजीव असून सद्या त्यांच्यावर धरणगाव तालुका मराठा फाऊंडेशनचे तालुका सचिव, समस्त पाटील समाज पंच मंडळाचे सदस्य तसेच, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याप्रसंगी श्री. मंगेश पाटील सरांनी उपस्थितांना सांगितले की, नुकत्याच कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगात ऑक्सिजन अभावी आपल्या कित्येक बंधू – भगिनींना प्राण गमवावे लागले. म्हणून प्रत्येक बांधवांनी आपल्या वाढदिवसाला वायफळ खर्च न करता एक तरी वृक्ष लावून संगोपन करावे. तसेच, यामुळे पर्यावरण व निसर्गाचे समतोल राखता येईल. तसेच, आज करण्यात आलेले संपूर्ण वृक्षांची संगोपनाची जबाबदारी मी सांभाळणार असेही श्री.पाटील म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. डी.जी. चव्हाण नाना, वरिष्ठ लिपिक श्री.रितेश साळुंखे, प्रा. डॉ. कांचन महाजन, प्रा. डॉ. डी. के. गायकवाड, ग्रंथपाल लिपिक श्री. नारायण चव्हाण आणि दिपक पाटील ई. उपस्थित होते.