सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादनसामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई,
सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विज्ञानवादी, सुधारणावादी विचारांची चळवळ पुढे घेऊन जात अनिष्ट प्रथा व अंधश्रद्धांचं समाजातून समूळ उच्चाटन करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. डॉ. दाभोलकर वैद्यकीय तज्ञ होते. आंतरराष्ट्रीय किर्तीचे कबड्डीपट्टू, शिवछत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू होते. ते विचारवंत होते. लेखक होते. पत्रकार होते. महत्त्वाचं म्हणजे ते सक्रिय सामाजिक कार्यकर्ते होते. बुद्धीवादी, विज्ञानवादी, सुधारणावादी, चिकित्सक समाजाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी जीवनभर निष्ठेनं कार्य केलं. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी केली. अशिक्षित, अज्ञानी, दुर्बल घटकांचे शोषण करणार्या अनिष्ट रुढी, अनिष्ट प्रथा, समाजविघातक अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन केले. जनजागृती केली. विचारांचा विरोध विचारांनीच केला पाहिजे, या दृढ विश्वासातून ते निष्ठेने काम करीत राहिले. त्यांचे विचार कधीही संपणार नाहीत. डॉ. दाभोलकरांना विनम- अभिवादन.