जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे गोवंश घेऊन जाणारा कंटेनर काल रात्री पोलिसांनी पकडला.

दैनिक महाराष्ट्र सारथी प्रतिनिधी दीपक दाभाडे यांचेकडून

  जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे गोवंश घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक UP21-BN3071काल रात्री स्थानिक गोरक्षक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पकडला.
गो - रक्षक कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून गो -वंश नी भरलेला कंटेनर जळगाव येथील कुसुंबा शिवारातील आर सी बाफना गो-शाळेत पोलीस घेऊन आलेत.


परंतु त्या कंटेनर मधील संपूर्ण गो-वंश मृत स्थितीत आढळून आलेत, 
 पोलिसांनी मृत गो-वंश चा पंचनामा श्री गोपाळ गुडे व देविदास इंदलकर  या पंचांसमक्ष पंचनामा केला असता त्यामध्ये बत्तीस वासरू बैल, व दोन गाय आढळल्या.

आर सी बाफना गो शाळेचे मॅनेजर अभ्यंकर यांच्या माध्यमातून गो शाळे जवळील पटांगणात जेसीबी द्वारे भला मोठा खड्डा खोदून त्यामध्ये सर्व मृत गो-वंश ला जमिनीत पुरण्यात आले.
त्यावेळी त्यांच्या मदतीला हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री मोहन जी तिवारी, सुशील इंगळे, प्रवीण कोळी, व अन्य सहकारी यांनी अथक परिश्रम घेऊन मदत केली,

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!