राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्कारातील गर्दी प्रकरणी गुन्हा दाखल
महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी दीपक दाभाडे यांचेकडून
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उसळलेल्या गर्दीत शासकीय नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अखेर शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिनांक २५ मे रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. अंत्यसंस्काराला जळगाव शहरासह जिल्ह्यातील मान्यवर नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती सुध्दा होती. यात फिजीकल डिस्टन्सींगच्या फज्जा उडाला होता. तसेच सध्या सुरू असणार्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करण्यात आले होते. यामुळे प्रशासन या प्रकरणी कारवाई करणार का ?
असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सोशल अॅक्टीव्हीस्ट दीपककुमार गुप्ता यांनी तातडीने ट्विटरवरून प्रशासनाला विचारला होता. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टॅग केले होते.
दीपक कुमार गुप्ता म्हणाले की, जळगावात सध्या सुरू असणार्या कडक निर्बंधांमध्ये कठोर कारवाई होत असून ती योग्य देखील आहे. प्रशासन अगदी मॉर्निंग वॉक करणार्यांवरही कारवाई करत आहे. यातच विवाहात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड ठोठावणारे प्रशासन अंत्यसंस्कारातील गर्दीबाबत गप्प का बसले आहे ? हाजी साहेब हे सर्वमान्य नेते होते. त्यांच्या निधनामुळे सर्वांप्रमाणे आम्हालाही दु:ख झाले आहे. मात्र नियम हा सर्वांना सारखाच हवा.यामुळे या प्रकरणी कारवाई होणार का ? असा प्रश्न दीपक कुमार गुप्ता यांनी विचारला होता.
दरम्यान, दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकामध्ये एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक आणि फैजल अब्दुल गफ्फार मलिक यांच्यासह अन्य ५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांच्या विरूध्द भादंवि कलम १८८, २६९ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनयम ५१ ब च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक व्ही. डी. ससे व उपनिरिक्षक अमोल कवडे हे करीत आहेत. दीपक कुमार गुप्ता यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. नियम हा सर्वांसाठी सारखा असावा अशी आपली भूमिका असल्याचा पुनरूच्चार देखील गुप्ता यांनी केला.
कुटूंब तुमचे जबाबदारी आमची..
जळगांव शहरात कुठेही कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळल्यास कॉल करा संपूर्ण घर मोफत सॅनिटायझर करून मिळेल…
जनमत प्रतिष्ठान..
पंकज नाले..
89285 55566
“जन सेवा हिच ईश्वर सेवा’