तहसीलदार देवरे यांनी शेत बांधावर जाऊन ई पीक पाहणी ऍप द्वारे केली जनजागृती.

धरणगाव प्रतिनिधी हर्षल चौहान.

शेतकरी करू शकणार ऍपद्वारे पिकांची नोंदणी : तहसीलदार देवरे

चिंचपुरा (धरणगाव) : आज दि.१९ ऑगस्ट रोजी धरणगावचे मा.तहसीलदार नितीनकुमार देवरे व महसूल कर्मचारी यांनी चिंचपुरा बु. येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी संदर्भात ऍपद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविले. ई पीक पाहणी वेळी तहसीलदार देवरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले की, महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२१ पावेतो राज्यभर राबवण्यात येत आहे. याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी ऍपचा उपयोग करून आपल्या शेतातील पिके त्याच बरोबर बांधावरील सातबारावर पिकांची नोंद कशी करावी. वरील नोंद करतेवेळी लक्षात घ्यावे की, वरील प्रोसेस करीत असताना शेतकऱ्याला शेतात असणं आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या पिकांची माहिती ई पीक पाहणी मोबाईल ऍप्लिकेशन नोंदणी कराल त्यावेळी तुमच्या शेतातील असलेल्या मुख्य पिकांचा फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. ई पीक पाहणी कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांनी नोंदणीचे आवाहन मा.तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी केले आहे. यावेळी ऍपद्वारे प्रात्यक्षिक सादर करतेवेळी चिंचपुरा बु. सरपंच कैलास पाटील, स्थानिक रहिवासी विजय पाटील, मंडळ अधिकारी एस आर बोरसे, तलाठी राहुल ढेरंगे, वाहनचालक मनोज पाटील, असलम पटेल व शेतकरी बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!