आजादी का अमृत महोत्सव सोहळ्यांतर्गत कोळसा मंत्रालयाच्या च्या वतीने दोन दिवसीय हस्तकला प्रदर्शन व विक्री उत्सवाचे आयोजन
नवी दिल्ली,
आजादी का अमृत महोत्सव सोहळ्यांतर्गत कोळसा मंत्रालयाच्या उचझऊखङ अर्थात कोल मायनिंग प्लॅनिंग डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेडच्या वतीने दोन दिवसीय हस्तकला प्रदर्शन व विक्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। उचझऊखङ च्या रवींद्रनाथ भवन मध्ये काल हे प्रदर्शन सूरी झाले सुरू झाले.
या उत्सवात ज्यूट पासून बनवलेली आकर्षक उत्पादने, फ्रेम्स, स्मृतिचित्रे, लाकडी कलाकृती, बांबूच्या कलाकृती, हॅन्ड बॅग आणि टेराकोटा कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रांची जिल्ह्यातील आजूबाजूच्या ग-ामीण भागातील स्त्रियांनी या कलाकृती साकारल्या आहेत.
प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापराला आळा घालणे आणि चिकणमाती, ज्यूट, बांबू इत्यादी पर्यावरण स्नेही नैसर्गिक संसाधनांपासून बनलेल्या वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. पर्यावरणाच्या र्हासाला आळा घालणे आणि स्थानिक कारागिरांना आर्थिक मदत या दृष्टीने याचा उपयोग होईल.