विराट कोहलीच्या जागेवर रोहित शर्माचा दावा, इतिहास रचण्याची हिटमॅनला संधी
मुंबई,
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील लॉर्ड टेस्टनंतर जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. इंग्लंडचा कॅप्टन जो रुट यानं लॉर्ड टेस्टमध्ये 180 रनची खेळी केली होती. त्यामुळे तो टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 च्या जवळ आला आहे. या रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन नंबर 1 वर आहे. तर इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये फार कमाल करु न शकलेला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याच्या अडचणीत भर पडली आहे.
विराट सध्या 776 पॉईंटससह पाचव्या नंबरवर कायम आहे. पण, त्याच्या टॉप 5 मधील स्थाला धोका वाढला आहे. विराटला हा धोका अन्य कोणत्या बॅटसमनपासून नाही तर हिटमॅन रोहित शर्मा पासून वाढलाय. रोहितचे सध्या 773 पॉईंटस असून तो विराट कोहलीपासून फक्त 3 पॉईंटस दूर आहे. आता भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लीडमध्ये 25 ऑॅगस्टपासून तिसरी टेस्ट सुरु होणार आहे. या टेस्टमध्ये रोहित शर्मानं अर्धशतक झळकावलं आणि विराट पुन्हा एकदा फ्लॉप ठरला तर रोहित शर्मा आयसीसी रँकिंगमध्ये विराटच्या पुढं जाण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माला आजवर नेहमीच वन-डे आणि टी-20 प्रकारातील बॅटसमन समजले गेले आहे. पण त्याने गेल्या काही महिन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंड दौर्यात त्याने चेन्नईत शतक झळकावले होते. तसंच लॉर्ड टेस्टमध्ये पहिल्या इनिंगंध्ये 83 रनची खेळी केली होती. या कामगिरीमुळे रोहितची रँकिंग सुधारले आहे. आता रोहितनं विराटला मागं टाकल्यास त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील तंत्रावर प्रश्न विचारणार्या टीकाकारांची तोंड बंद होतील.
तर दुसरिकडं, मागच्या 21 महिन्यांपासून विराटची बॅट शांत आहे. या दरम्यान टेस्ट, वनडे आणि टी-20 च्या एकूण 49 इनिंगमध्ये विराटला एकही शतक करता आलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या टेस्टमध्येही विराटला मोठी खेळी करता आली नाही.
विराटने दुसर्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 42 रन तर दुसर्या इनिंगमध्ये 20 रन केले. कोहलीने अखेरचं शतक 23 नोव्हेंबर 2019 साली बांगलादेशविरुद्ध केलं होतं. यानंतर 21 महिने झाले तरी त्याला एकही शतक करता आलं नाही.