वडगाव जवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस व आयशर पोल्ट्री वाहतूक गाडीचा अपघात.. सुदैवाने जीवितहानी नाही.
निंभोरा बु. – प्रमोद कोंडे.
सावदा रावेर मेन रोडवर वडगाव गांवाजवळ निंभोरा फाटा क्रांसिंग वर धुळे रावेर ही बस क्र. MH 20 BL 0932 ही बस सावदा कडून रावेर कडे जात असताना वडगाव ता. रावेर या गांवाजवळ निंभोरा फाट्यावर रावेर कडून येणारी आयशर पोल्ट्री वाहतूक गाडी क्र. MH 04 FJ 7127 या गाडीने समोरून येणाऱ्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला ठोस मारल्याने बस चालक प्रविण प्रभाकर बारी ,कंडाक्टर याकूब अहमद तडवी यावल बस डेपो, तसेच बस मधील प्रवासी शकील बी अकिल तडवी, रशीदा बी इस्माईल तडवी राहणार फैजपूर, सीताबाई सुपडू धनगर राहणार मुंजलवाडी, गणेश दिनकर घोगे खिरवड ,आयशर गाडी चालक मोहम्मद आलम शहा ,किन्नर शेख सादीख शेख हुसेन राहणार बुऱ्हाणपूर व राजाराम बापुराम इंगळे राहणार फैजपूर हे किरकोळ जखमी झाले आहे. सुदैवाने जीवितहानी नाही. बस व आयशर गाडीचे नुकसान झाले आहे. याबाबत निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस चालकानी खबर दिल्याने गु. र. नं.११५ / २१ प्रमाणे २७९,३३७,४२७, मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.