राधाकिशन दमानी जागतीक शीर्ष शंभरच्या सर्वांत श्रीमंतांच्या यादीत सामिल
नवी दिल्ली,
दिग्गज गुंतवणुकदार आणि अब्जाधीश राधाकिशन दमानी जे रिटेल चेन डीमार्टचे मालक आहेत ते आता जगातील 100 सर्वांत श्रीमंताच्या यादीत सामिल झाले आहेत. एका साधारण पार्श्वभूमीत वाढलेले दमानी आता ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्समध्ये 1920 कोटी डॉलरच्या संपत्तीसह 98 व्या स्थानावर आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्स जगातील सर्वांत श्रीमंत लोकांची दैनिक रॅकिंग आहे. शीर्ष शंभरमध्ये अन्य भारतीयांमध्ये मुकेश अंबानी, गौतम अडानी, आझीम प्रेमजी. पल्लोनजी मिस्त्री, शिव नादर, लक्ष्मी मित्तल आहेत.
दमानीचे पालन पोषण एका मारवाडी कुटुंबात मुंबईतील एका खोलीच्या अपार्टमेंटमध्ये झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्याचा अभ्यास केला परंतु एक वर्षानंतर ड्राफ्ट आऊट झाले होते. दलाल स्ट्रिटवर काम करणार्या आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर दमानीनी आपला बॉल बेयरिंग व्यवसाय सोडून दिला आणि स्टॉक मार्केट ब-ोकर आणि गुंतवणुकदार बनले.
वर्ष 1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळा समोर आल्यानंतर त्यानी त्या दरम्यान कमी विक्रीच्या नफ्याच्या कारणामुळे आपल्या उत्पन्नात एक मोठी वाढ पाहिली. त्यांनी वर्ष 2000 मध्ये आपल्या हायपरमार्केट मालिका, डीमार्ट सुरु करण्यासाठी शेअर बाजार सोडले. त्यांनी 2002 मध्ये पवईमध्ये पहिला स्टोर स्थापित केला. वर्ष 2010 मध्ये या मालिकेचे 25 स्टोर उघडले गेले. यानंतर कंपनी गतीने वाढत गेली आणि 2017 मध्ये सार्वजनिक झाली. दमानीचे राहणीमान साधारण आहे आणि शायदच कधी एखादी मुलाखत देतात. त्यांनी भारतीय अब्जाधीश राकेश झुनझुनवालांना आपल्या स्टॉक ट्रेडिंगचे तंत्र शिकविले. 2020 मध्ये दमानी 1650 कोटी डॉलरच्या संपत्तीसह चौथे सर्वांत श्रीमंत भारतीय व्यक्ती बनले आणि ते अब्जाधीशाच्या जागतीक यादीमध्ये 117 व्या स्थानी होते