निंभोरा येथील रहिवाशी विदयार्थी अमेरिकेतील न्युयार्क विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी मास्टर इन सॉफ्टवेअर या अभ्यासक्रमासाठी रवाना.
निंभोरा बु.-प्रमोद कोंडे
निंभोरा बु. तालुका रावेर येथील रहिवाशी स्व.मधुकर टीकाराम दोडके (पाटील ) यांचे नातू आणि माजी लोकमत पत्रकार अनिल भाऊ दोडके यांचा पुतण्या सुनील मधुकर पाटील यांचा मुलगा चि. धीरज सुनील पाटील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील न्युयार्क येथील न्यु जर्सी इंस्टिट्यूट आँफ टेक्नोलाँजी (NJIT) या विदयापीठात मास्टर इन साँफ्टवेअर (M.S.) या अभ्यासक्रमासाठी 25 ऑगस्ट रोजी जात आहे. चि.धीरज याचे परिसरातुन, नातेवाईकांतुन कौतुक होत आहे. जय भवानी मित्र मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले व त्यास भावीवाटचालीस शुभेच्छा दिल्या.या वेळेस जय भवानी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोंडे, कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती दुर्गादास पाटील, माजी पत्रकार भास्करराव महाले, अनिल दोडके, रामभाऊ दोडके, महेंद्र महाले,ग्रामपंचायत कर्मचारी ललित दोडके, किशोर बोरोले, सुरेश बोरनारे उपस्थित होते.