उत्तर मुंबई विभागातील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 18 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील, उत्तर मुंबईमधील सहा मतदारसंघात राष्ट्रीय वयोश्री योजनेद्वारे दि. 25, 26, 27, 30 ऑगस्ट व 1, 2 सप्टेंबर, या दिवशी ज्येष्ठ नागरिकांना साधने आणि उपकरणे यांचे नि:शुल्क वाटप करण्यासाठी चाचणी शिबिर खासदार, गोपाल शेट्टी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना छडी, वॉकर, व्हिलचेअर, कानाचे मशीन, चष्मे, कृत्रिम दात, व्हिल चेअर कमोड सहित, ट्रायपॉड व पेट्रापॅाड इ. यंत्रे व उपकरणे देण्यात येतील. तरी या विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी आपले सरकार केंद्र (Common Sservice Centre) येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेत नावनोंदणी करावी. नोंदणीसाठी  आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला व  पासपोर्ट साईज फोटो कागदपत्रे अनिवार्य आहे.

तरी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी नावनोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर श्री. प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!