कोरोना महामारीमध्येही या वर्षी जेईई मेंन्साठी 25 लाखापेक्षा अधिकची नोंदणी
नवी दिल्ली
कोरोना महामारीला पाहता विविध परिक्षांच्या पध्दती आणि कार्यक्रमांमध्ये अनेक धोरणात्मक बदल करण्यात आले आहेत. या बदलांच्या माध्यमातून अनेक प्रतिस्पर्धी आणि उच्च शिक्षणाशी सबंधीत परिक्षांना दूरवर्ती भागातील उमेदवारांसाठी अधिक सोपे बनविले जात आहे. नवीन धोरणाच्या कारणामुळे वर्तमान कॅलेंडर वर्षात जेईई मेन्स सारख्या महत्वपूर्ण परिक्षांसाठी 25 लाखापेक्षा अधिक नोंदणी झाली आहे.
राष्ट्रीय परिक्षा संस्था (एनटीए) नुसार जेईई मेंस चौथ्या टप्प्याच्या परिक्षेमध्ये सामिल होण्यासाठी 7.32 लाख विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. चौथ्या टप्प्यातील परिक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जुलैमध्ये झालेल्या जेईई मेंसच्या तिसर्या टप्प्यातील परिक्षेमध्ये 7 लाख 9 हजार 529 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर पहिल्या व दुसर्या टप्प्यातील जेईई मेंस परिक्षांमध्ये सरासरी जवळपास 6.3 लाख विद्यार्थी सामिल झाले होते.
जेईई मेंसच्या चौथ्या टप्प्यातील परिक्षा या महिन्याच्या 26 ऑगस्ट पासून सुरु होतील आणि जेईई मेंसचा हा शेवटचा टप्पा आहे. या परिक्षांनंतर ऑक्टोंबरमध्ये जेईई अॅडव्हाँसची परिक्षा आयोजीत केली जाईल.
चौथ्या टप्प्यातील जेईई मेंस परिक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान आयोजीत केल्या जातील. देशभरातील आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई (अॅडव्हाँस) 2021 ची परिक्षा या वर्षी 3 ऑक्टोंबर 2021 ला आयोजीत केली जाईल.
जेईई अॅडव्हाँस्ड परिक्षेची घोषणा स्वत: केंद्रिय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की जेईई अॅडव्हाँस्डची परिक्षा 3 ऑक्टोंबरला आयोजीत केली जाईल. या परिक्षांच्या दरम्यान कोरोना प्रोटोकॉलला पूर्णपणे लक्षात ठेवले जाईल.
शिक्षण मंत्रालयानुसार कोरोनाला पाहता या वेळी 334 शहरांमध्ये या परिक्षा आयोजीत केल्या जातील तर या आधी या परिक्षा 232 शहरांमध्ये आयोजीत करण्यात आल्या होत्या.
केंद्रिय शिक्षण मंत्रालयानुसार क्षेत्रीय भाषांमध्येही जेईईच्या परिक्षा घेण्यात येतील देशातील कोणताही विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून परिक्षा देऊन इंजीनियरिंग करु शकतो आहे. या वेळी 13 विविध भाषांमध्ये जेईई परिक्षा आयोजीत केल्या जात आहेत.