बुमराह आणि शमीला माहिती व्हावे की आम्हांला त्यांच्यावर गर्व आहे – कोहली
लंडन
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला माहिती व्हावे की आम्हांला त्यांच्यावर गर्व वाटतो आहे असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
बुमराह आणि शमीने इंग्लंड विरुध्दच्या दुसर्या कसोटी सामन्यात दुसर्या डावात नवव्या गडयासाठी 89 धावांची भागेदारी केली होती आणि याच्या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र इंग्लंडचा संघ या लक्ष्याला गाठू शकला नाही आणि त्यांना 151 धावांच्या फरकाने पराभवाला सामोर जावे लागले होते.
कोहलीने सामन्यानंतर म्हटले की बुमराह आणि शमीने जे केले त्यासाठी त्यांची प्रशवंसा करु इच्छित आहे. जे गोलंदाज जास्त फलंदाजी करत नसतात या स्थितीमध्ये अशा गोलंदाजासाठी खेळणे आव्हानात्मक असते आहे . संघाला सर्वांत जास्त गरज होती अशा वेळी या दोघांनी आपले योगदान दिले.
त्याने म्हटले की मागील दीड वर्षा पासून कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही ज्यावेळी सर्वाधिक यशस्वी होतोत त्यावेळी आमच्या तळातील क्रमाने खूप योगदान दिले होते. फालंदाजी प्रशिक्षकांनी खेळाडूंंसाठी खूप मेहनत केली आहे आणि सर्वांत जरुरी हे आहे की ज्यावेळी ते फलंदाजी करण्यासाठी जातात तर त्यांना विश्वास असतो की ते संघासाठी धावा करु शकतात. मला वाटते की हा विश्वास यापूर्वी नव्हता.
लॉर्डस मैदानावर मिळालेला विजय 2014 च्या समान आहे का असे विचारले असता कोहलीने म्हटले की मागील वेळी ज्यावेळी आम्ही येथे विजय मिळविला त्यावेळी मी त्या सामन्यात खेळलो होतो आणि महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली एका खेळाडूच्या रुपात खेळत होतो. ते खूप विशेष होते आणि इशांत शर्माने खूप शानदार गोलंदाजी केली होती.
त्याने म्हटले की हा विजय मात्र आम्हांला 60 षटकात मिळाला आणि हे खूप विशेष आहे व ज्यावेळी मोहम्मद सिराज सारखा एकदा गोलंदाज जो पहिल्यांदा लॉर्डसवर खेळत होता आणि ज्या प्रकारे त्यांने गोलंदाजी केली ती उत्कृष्ट होती.
कर्णधार कोहलीने स्पष्ट केले की भारतीय संघ उर्वरीत तीन कसोटी सामन्यात चांगल्या प्रकारे खेळेल. अजूनही तीन सामने बाकी आहेत आणि या सामन्यानंतर आम्ही आरामाने बसणार नाहीत आणि याला सहज असे समजू नये आम्ही पुढील सामन्यात अजून गतीसह खेळण्यासाठी उतरुत.