जन आशिर्वाद यात्रेतून – जनतेशी संवाद, विकास कामाचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहचविण्याचा मानस ..

प्रतिनिधी -प्रमोद कोंडे

दि.16.ऑगस्ट पासून केंद्र सरकारचे ३९ नविन मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘संकल्पनेतून जनतेचा आर्शिवाद घेण्यासाठी देशातील २९२ लोकसभा क्षेत्रात १९ हजार ५६७ किलोमीटरचा प्रवास करून २२ राज्यांमधील २६५ जिल्ह्यामध्ये १६६३ कार्यक्रमांना उपस्थित राहून केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी व सामान्य जनतेच्या भेटी घेवून घेणार आहेत. भारताच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने केंद्रीय मंत्री जनतेमध्ये मिसळणार आहेत. मोदी सरकारने २७ ओबीसी समाजाच्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात केला आहे. ठाणे जिल्हात पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचा बहुमान खासदार कपिल पाटील यांच्यारूपाने आगरी समाजाला मिळाला आहे. कबिनेट मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री डॉ. भारती पवार व रावसाहेब दानवे हे देखील जन आशिर्वाद यात्रा काढणार असून केंद्रातील भाजपच्या सरकारने अनेक विकासभिमुख योजना आणल्या, त्या तडीस नेल्या आणि असंख्य लोकाभिमुख कामे केली. मागील ७ वर्षात केलेल्या या कामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहचविण्याचा आणि जनतेचा आशिर्वाद घ्यायचा हा उद्देश या १६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जन आशिर्वाद यात्रेचा आहे. आपण मंत्री असलो तरी जनसेवक आहोत यासाठी जनतेला नम्रपणे भेटा असा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे. मागील ७ वर्षात मोदी सरकारने केलेल्पा अनेक लोकाभिमुख कामांपैकी काही महत्वाच्या कामांचा आढावा या जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्त करणे आवश्यक आहे.
देशातील गोरगरीबांना परवडणाऱ्या दरात घरे आणि आरोग्य सेवा, आयुर्विमा उपलब्ध करून देणे, गरीबांना पक्की घरे बांधून देणे, गरीबांना मोफत वीज देणे, गरीबांची बँक खाती उघडणे, आयुष्यमान भारत योजना, गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणे, यासारख्या असंख्य निर्णयातून मोदी सरकारने गरीबांच्या कल्याणासाठी असलेली कटीबद्धता दाखवून दिली
कोरोनाने जगातील सर्व व्यवहार थांबले, भारताला याचा फटका बसू नये यासाठी ८० कोटी जनतेला मोफत अन्न धान्य देण्यात आले. रोजगार बुडू नये यासाठी गरीब कल्याण रोजगार अभिनयातून देशातील लाखो गरीबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
गरीबी निर्मूलनासाठी मोदी सरकारने अनेक योजना आणल्या. पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत देशात ४१ कोटी गोरगरीबांची खाती उघडण्यात आली. सरकारी योजनांचे अनुदान या योजनेतून थेट गरीबांच्या बँक खात्यात जमा होत आहे. जेष्ठ वृद्ध नागरीकांना सहाय्य हावे यासाठी अटल पेंशन योजना सुरू करण्यात आली या योजनेतून देशात ३ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना १ हजार ते ५ हजार इतके निवृत्त वेतन दिले जात आहे. शेतक-यांना विविध नैसर्गिक संकटापासून होणारे नुकसान भरुन देण्यासाठी पंतप्रधान पीक योजनेच्या माध्यमातून जवळपास साडेनऊ कोटी शेतकऱ्यांनी आपली नाव नोंदणी केली आहे. छोटया आणि गरीब शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी ६ हजार इतके अर्थसाहाय्य केले जाते. देशातील ११ कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. केंद्र सरकार या योजनेसाठी दरवर्षी ७५ हजार कोटी रुपये खर्च करीत आहे.
देशात विजेची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान उजाला योजनेच्या माध्यमातून ३६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८०९ एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले आहे.
कोरोना काळात सर्वाधित आर्थिक फटका बसला छोटे विक्रेते आणि फेरीवाले यांना. अशा फेरीवाले व विक्रेत्यांसाठी पंतप्रधान आत्मनिर्भर (स्व.निधी) योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून १० हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. आतापर्यंत या योजनेखाली अर्थसाहाय्य मिळविण्यासाठी जवळपास ४३ लाख फेरीवाले व विक्रेते यांनी अर्ज केले त्यातील २५ लाखाहन अधिक फेरीवाले व विक्रेते यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
महागडे वैद्यकिय उपचार मोफत मिळावे यासाठी गोरगरीब व अल्प उत्पन्न असलेल्या नोकरदांसाठी पंतप्रधान आयुष्यमान योजना सुरू केली याचे देशभरात ५० कोटी लाभार्थी आहे. आतापर्यंत
२ कोटी गरीब जनतेने जन आरोग्य योजनेद्वारे मोफत उपचार केले आहेत. जेनेरीक औषधे कमी किंमतीत मिळावी यासाठी पंतप्रधान जनपौधी योजना,
महिलांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देवून मोफत गॅस कनेक्शन, पुढील २५ वर्षाचा विचार करून आखलेले नविन शैक्षणिक धोरण, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, युवकांमधील कौशल्याला वाव देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजना, परंपरंगात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्फूर्ती योजना, युवकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पंतप्रधान युवा योजना यासारख्या असंख्य योजना मागील ७ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून सुरू झाल्या असून पुढील दशकात भारताला सक्षम बनविण्याचे कार्य केंद्र सरकारकडून होत आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या जन आर्शिवाद यात्रेतून या सर्व योजना जनतेसमोर नेऊन त्यांच्या लाभार्थ्यांना भेटणे व त्यांचा आशिर्वाद घेऊन पुन्हा योजना प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत.
नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशिर्वाद यात्रे निमित्त प्रा.अनिल बोरनारे प्रदेश सहसंयोजक भाजपा शिक्षक सेल मुंबई यांनी लिहिलेला लेख.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!