शनिवारपासून औद्योगिक वसाहतीत मालवाहतुकीचे नवे नियम!

जालना,

औद्योगिक वसाहतीत मालवाहतूक करण्यासाठी हमाली, काटा व डाग पार्सल या भुदर्ंडातून मालवाहतूक दारांची मुक्तता झाली असून उद्योजक घनश्याम गोयल यांनी सर्व उद्योजकांच्या वतीने मालवाहतूक दारांच्या मागण्या मान्य करत येत्या शनिवार ( ता. 21) पासून औद्योगिक वसाहतीत नवीन नियमांनुसार मालवाहतूक केली जाणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

” ज्याचा माल त्याचा हमाल, नो काटा, नो डाग ” या नियमांनुसार मालवाहतूक व्हावी या साठी मालवाहतूक दारांनी आग्रही भूमिका घेतली होती. त्या अनुषंगाने जालना जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन व गाडी मालक संघटनेच्या झालेल्या बैठकांत स्वातंर्त्य दिना पासून नवीन नियम मान्य झाल्याशिवाय मालवाहतूक सुरू करायची नाही. असा ठाम निर्धार मालवाहतूकदारांनी केला होता. या पार्श्?वभूमीवर सोमवारी ( ता. 16) सर्व वाहने ट्रान्सपोर्ट कार्यालयांच्या परिसरात उभी होती. दुपार पयर्ंत एकही गाडी औद्योगिक वसाहतीत गेली नाही.मालवाहतूक दारांच्या एका शिष्टमंडळाने उद्योजक घनशाम गोयल यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. नागपूर येथे मागील पाच वषार्ंपासून ” ज्याचा माल, त्याचा हमाल ” यानुसार मालवाहतूक केली जाते. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन ने संपूर्ण देशभरात दि. 1 जुलैपासून हा नियम लागू करण्याबाबत निश्चित केले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुद्धा केली जात असली तरी जालना येथे मात्र या नियमांची अंमलबजावणी केली जात नसून ती त्वरित करण्यात यावी .असे शिष्टमंडळाने घनश्याम गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले .श्री. गोयल यांनी सर्व उद्योजकांशी या संदर्भात विचार विनिमय करत अखेर मालवाहतूक दारांच्या मागण्या मान्य केल्या. तथापि आगामी चार दिवसांपयर्ंत जुना माल पडून असल्याने जुन्या नियमानुसार मालवाहतूक करावी तसेच येत्या शनिवारपासून ( ता. 21) नवीन नियमानुसार मालवाहतूक सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. यास उद्योजक घनश्याम गोयल यांनी दुजोरा दिला.

या वेळी सुरेश उपाध्याय ,दत्ता काकडे, किशोर कदम, संजय करवा, कुलदीप अग्रवाल ,पंकज लोहिया, मोईन नाना, फिरोज खान, अलोक शहा, शेख गब्बर ,संजय आंबेकर ,पप्पू नागडा, बाबुलाल पठाण, दिनेश लोहिया , राहुल उपाध्याय यांच्यासह गाडी मालक व मालवाहतूक दार उपस्थित होते.

चौकट…

मोंढ्यातील मालवाहतूकी बाबत आज निर्णय!

औद्योगिक वसाहतीत यशस्वी चर्चे नंतर मालवाहतूक सुरळीत करण्यात आली. तथापि नवीन मोंढा भागातील मालवाहतूकी बाबत व्यापारी बांधवांशी उद्या मंगळवारी ( ता. 17) चर्चा केली जाणार असून त्यानंतरच मालवाहतूकी बाबत निर्णय घेतला जाईल. असे मालवाहतूक दारांच्या वतीने सांगण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!