इंटेरियर डेकोरेटर व आर्किटेक्चरशिप यांचे मूळ सुतार समाजाच्या कलेतच आहे : डॉ . सचिन पाटील यांचे प्रतिपादन

[ सुतार समाजाच्या विविध संघटनांतर्फे राहुल लुलेचा हृद्य सत्कार ]

जळगांव-

इंटेरीयर डेकोरेटर्स व आर्किटेक्चरशीप यांचे मुळ सुतार समाजाच्या कलेतच आहे ” असे प्रतिपादन माजी म .न .पा .जळगाव शिक्षण सभापती डॉ.सचिन पाटील यांनी केले. सोमवार दि. १६ ऑगस्ट २०२१ रोजी विजय लुल्हे आयोजित राहुल किरण लुले याच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून सभापती पाटील बोलत होते.सत्कार समारंभास प्रमुख अतिथी सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल व जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले उपस्थित होते.मार्गदर्शनात सचिन पाटील पुढे म्हणाले की ,” सुतार समाज हा नेहमी सर्वांना समतेने घेऊन चालणारा शांतताप्रिय कार्यमग्न समाज आहे .”
एम .जे.कॉलेजचा इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी राहुल किरण लुले याने ९५.५ % गुण प्राप्त करून घवघवीत यशा प्राप्त केले त्याप्रित्यर्थ राहुल याचा सत्कार विजय लुल्हे यांचे तर्फे डॉ. सचिन पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन हृद्य सत्कार केला.तसेच जनमत प्रतिष्ठान तर्फे सन्मानपत्र देऊन पंकज नाले ,
विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव यांच्यातर्फे अध्यक्ष अरुण जाधव,व्हि.व्हि.एस.संघटनेतर्फे प्रदेश उपाध्यक्ष संजय दिक्षित ,विश्वकर्मा सेनेतर्फे सदस्य भागवत लुले यांनी सत्कार केला.जळगाव म.न.पा.प्रभाग समिती एकला बिनविरोध सभापती निवडून आल्या प्रित्यर्थ डॉ.सचिन पाटील यांचा विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळातर्फे अध्यक्ष अरुण जाधव यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार केला .
सत्कारानंतर प्रमुख अतिथी डॉ.मिलिंद बागुल मार्गदर्शन करतांना म्हणाले की , ” उमेद आणि निरंतर उत्साह यात विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक आहे.आपल्या समाजाला कधीही दुय्यम लेखू नका.समाजसेवेतच राष्ट्रसेवेची सुप्त बीजं असतात .” ज्येष्ठ समाजसेवक एम.टी.लुले यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थी दशेतील प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या गुणवत्तेचे गमक व नोकरीच्या कालावधीतील निष्कलंक कार्यशैली सांगितली .सत्कार समारंभाची प्रेरणा मातोश्री .सिंधु सुतार ,बाळकृष्ण सोनू लुल्हे ,संजय वाघ यांनी दिली.सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सत्कार संयोजक विजय लुल्हे यांनी केला .
सत्कार समारंभास विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळाचे खजिनदार मनोहर रुले ,सदस्य निलेश सोनवणे, सचिव एम. टी .लुले , किरण लुले, कृणाल लुले,सौ.सिमा लुले,सौ.शालिनी लुले,चित्रकार सुनिल दाभाडे ( मानवसेवा विद्यालय ,जळगाव ) , बागल उपस्थित होते .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!